NMC News : मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका मुख्यालयात संपर्क कार्यालय सुरू केले.
त्याचे समर्थन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या सोईसाठी असल्याचे सांगितल्यानंतर आता नाशिक महापालिका मुख्यालयातदेखील पालकमंत्री दादा भुसे यांचे संपर्क कार्यालय लवकरच दिसून येणार आहे.
यासंदर्भात भुसे यांनीच दुजोरा दिला असून, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने होण्यासाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. (Guardian Minister Office at Nashik Municipal Headquarters soon nashik news)
मुंबई महापालिका मुख्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संपर्क कार्यालय सुरू केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या वॉर रूमला भेट देण्याबरोबरच समस्यांच्या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देत आहे. त्याचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात उमटले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोढा यांचे समर्थन करताना प्रशासकीय राजवट तसेच नगरसेवक नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात तक्रारी घेऊन येतात. त्या तक्रारींचे निवारण करणे गरजेचे आहे. त्यासाठी संपर्क कार्यालय सुरू केल्याची पाठराखण केली. फडणवीस यांनी लोढा यांना दिलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेतदेखील पालकमंत्री भुसे यांनी कार्यालय सुरू करणार असल्याचे संकेत दिले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कामकाजाची झाडाझडती
लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनावर अंकुश नाही. अधिकारी मनमानी पद्धतीने काम करतात. महापालिकेच्या ऑनलाइन पोर्टलवर तक्रारींचा ढीग साचला आहे. अतिक्रमण वाढतं आहे. पार्किंगच्या समस्येने तोंड वर काढले आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नगर रचना विभागातून बांधकाम, आरोग्य विभागामधून वैद्यकीय अशा महत्त्वाच्या टेबलवर काम करण्याची स्पर्धा लागली आहे. चुकीच्या पद्धतीने बदल्या केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात बैठक होणार असून, त्यात कामांचा आढावा घेतला जाणार आहे. त्याशिवाय दैनंदिन तक्रारींचा निपटारा करण्यासाठी संपर्क कार्यालयाची आवश्यकता पालकमंत्र्यांनी अधोरेखित केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.