खामखेडा (जि. नाशिक) : खामखेडा (ता. देवळा) येथील माहेरवासीन व सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया सॅन डिएगो कार्ल्सबाड येथे राहणाऱ्या मीरा जाधव शेवाळे व प्रभाकर जाधव दांपत्याने आपल्या घरी अमेरिकेमध्ये पारंपारिक पोशाख परिधान करून घरासमोर गुढी उभारून पाडवा उत्साहात साजरा केला. (Gudhi Padwa Festival resident of Khamkheda built Gudhi in America nashik news)
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी ते सर्व सण उत्साहात साजरे करत आहे. कसबेसुकेणे येथील प्रभाकर जाधव हे शास्रज्ञ म्हणून तर मीरा जाधव या बँकेतून निवृत्त झाल्यावर अमेरिकेत स्थायिक आहेत.
त्या दरवर्षी भारतीय सण पारंपारिक पद्धतीने साजरे करत महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडवत असतात. यावर्षी गुढीपाडवा सण साजरा करताना त्यामध्ये काही स्थानिक अमेरिकन शेजारी देखील सहभागी झाले होते.
"आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी आपले सण-उत्सव साजरे करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. भारतीय संस्कृती आणि येथील संस्कृती यात ओढाताण न करता आपले उत्सव परदेशात साजरे करताना वेगळे समाधान मिळते"- मीरा जाधव- शेवाळे, कॅलिफोर्निया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.