लासलगाव (जि.नाशिक) : महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात ‘गिन्नी’ गवत व ‘हत्ती’ गवत यांसारख्या कच्च्या मालावर आपली आर्थिक घडी बसविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. पाचोरेसारख्या ग्रामीण भागातील अॅड. उत्तम नागरे यांनी ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या तत्त्वावर विविध कचऱ्यापासून जैविक इंधन व सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. (Guinea-grass-for-farmers-for-biofuel-revolution-nashik-marathi-news)
जैविक इंधन क्रांतीसाठी ‘गिन्नी गवत’ शेतकऱ्यांसाठी वरदान
देशासमोर असलेल्या तीन मोठ्या संकटांपैकी शेतमालाचे होणारे अतिरिक्त उत्पादन, गहू, भात, कांदा, ऊस व इतर धान्याला भाव कमी असल्याने शेतकरी बांधवांची आर्थिक स्थिती कमालाची खालावलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसमोर शाश्वत उत्पन्न देणाऱ्या पिकांची गरज आहे. २० टक्के खर्च हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा डोलारा असलेल्या पेट्रोलियम आयातीवर खर्च केला जातो. त्यामुळे देशाच्या विकासकामांसाठी उर्वरित रक्कम कमी पडत आहे. तसेच, प्रदूषण मोठ्या शहरांना भेडसावणारी मोठी समस्या आहे. या प्रमुख समस्यांचे मूळ रासायनिक इंधने, खनिज तेल यावर होणारा भरमसाट खर्च होय. यामुळे आपल्या नापीक जमिनीत वरील उत्पादन घेतल्यास ‘एमसीएल’सारख्या कंपनीने बायोडिझेल सीएनजी व सेंद्रिय खतांपासून भविष्यात उत्पादन करण्यासाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात अनुदानही मिळू शकते.
कचऱ्यापासून जैविक इंधन व सेंद्रिय खतनिर्मितीचे ध्येय
प्रदूषणमुक्त सेंद्रिय शेती शेतकऱ्यांच्या आर्थिक विकास व रोजगारनिर्मितीसाठी यातून सहज साध्य होणार आहे. निफाड तालुक्यातील ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचावण्यास याचा मोठा हातभार लागणार आहे. इंधनात स्वयंपूर्ण झालो, तर आपण निश्चित महासत्ता बनवू शकतो, हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून अॅड. उत्तम नागरे यांनी विविध कचऱ्यापासून जैविक इंधन व सेंद्रिय खतनिर्मिती करण्याचे ध्येय ठेवले आहे.
त्यांच्या या छोट्या प्रोजेक्टमध्ये निफाड तालुक्यातील चांदोरी, खडक माळेगाव, नांदूरमध्यमेश्वर, मांजरगाव, साकोरे, काथरगाव, सायखेडा, शिरसगाव, टाकळी विंचूर, गोंदेगाव, चाटोरी, शिवरे, महाजनपूर, शिंगवे, वडाळी नजीक, कसबे सुकेणे, पिंपळस रामाचे, चापडगाव, ओणे येथील ग्रामस्थांनी संमती दर्शविली आहे.
निफाड तालुक्यातील ब्रह्मा व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी याकामी शेतकरी बांधवांना ७०० एकर क्षेत्रांत गावोगावी जाऊन सभासद करून घेत आहे. प्रामुख्याने सीएनजीसाठी ‘गिन्नी’ व ‘हत्ती’ गवत यासाठी महत्त्वपूर्ण कच्चामाल आहे. शेतकऱ्यांना वर्षाकाठी दीडशे ते दोनशे टन गवत उत्पादित होऊ शकते. साधारणपणे प्रतिटन एक हजार रुपये दराने खरेदी केल्यास यातून तयार होणारे सेंद्रिय खत शेतकरी बांधवांना मिळणार आहे. -ॲड. उत्तम नागरे, प्रकल्प संचालक, पाचोरे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.