नाशिक : गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने सर्व विक्रम मोडीत काढत इतिहास रचला असला तरी याच राज्यातील एका मतदारसंघातदेखील निवडणुकीच्या निमित्ताने इतिहास घडला आहे. तापी जिल्ह्यातील व्यारा या आदिवासीबहुल मतदारसंघात वीस वर्षात पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलले. विशेष म्हणजे या यशामध्ये नाशिकचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्याकडे पक्ष नेतृत्वाने जबाबदारी सोपवल्यानंतर पंधरा दिवस तळ ठोकून ढिकले यांनी भाजप उमेदवाराला विजयश्री मिळवून दिली.
त्याचबरोबर आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्याकडे बडोद्याच्या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारीदेखीलचोखपणे पार पाडत सर्व उमेदवार निवडून आणण्यात मोठा वाटा फरांदे यांनी उचलला. (Gujarat Assembly Elections Nashik BJP MLA Shine in Gujarat elections nashik news)
आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्याकडे तापी जिल्ह्यातील व्यारा मतदारसंघ देण्यात आला. आदिवासीबहुल या मतदारसंघात वीस वर्षात भाजपला यश मिळाले नाही. गुजरात राज्यात भाजपची घोडदौड सुरू असताना हा मतदारसंघ भाजपच्या हाती लागत नसल्याचे शल्य नेत्यांमध्ये होते. त्यामुळे विशेष जबाबदारी ढिकले यांच्याकडे दिली होती.
इतर आमदारांना एक दिवसाचा दौरा असताना ढिकले यांच्याकडे मात्र व्यारा मतदारसंघात 15 दिवसांचे नियोजन देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने ढिकले यांनी पंधरा दिवस या मतदारसंघात ठेवून कोपरान कोपरा पिंजून काढला. परिणामी भाजपचे मोहन भाई कोकणी हे निवडून आले. माजी मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचा हा मतदारसंघ गड मांडला जातो. अनेक वर्षांपासून वाट पाहत असलेला हा मतदारसंघ ढिकले यांच्या नियोजनामुळे भाजपच्या पदरात पडला.
हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
प्रयत्नांना यश
मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्याकडे बडोदा जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली होती. फरांदे यांची गुजराती व इंग्रजी भाषेवरील पकड लक्षात घेऊन त्यांच्याकडे विशेष जबाबदारी दिली होती. दाभोई विधानसभा मतदारसंघातून शैलेश मेहता, कार्जनमधून अक्षयभाई पटेल, सावली मतदारसंघातून केतनभाई इनामदार, पदरामधून चैतन्यभाई झाला यांच्या विजयात आमदार फरांदे यांचे श्रेय महत्त्वाचे मानले जाते.
आमदार डॉ. राहुल आहेर यांनी नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या डांग जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात तर भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी डांग विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांचा प्रचार करून विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
"काँग्रेसची मक्तेदारी असलेला मतदारसंघ खेचून आणण्याची महत्त्वाची जबाबदारी होती. पंधरा दिवस तळ ठोकून सुक्ष्म नियोजनातून व पक्षाने केलेल्या कामातून यश मिळवून देता आले."
- ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.