Gurumauli Annasaheb More esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More: पर्जन्यसुक्ताद्वारे वरुणराजास साकडे घाला : गुरुमाउली यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : एक-दोन दिवस पाऊस येऊन गेला, त्याने थोडा आधार सर्वांना मिळाला; पण आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. मानवासह संपूर्ण जीवसृष्टी मेटाकुटीस आली.

या भयानक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सेवेकऱ्यांनी व सर्वच भाविक व नागरिकांनी लाखो, करोडोंच्या संख्येने पर्जन्यसुक्ताच्या माध्यमातून साकडे घाला, असे आवाहन गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी केले.

आपली हाक ऐकून तो निश्चितच धावून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Gurumauli Annasaheb More appeal Offer blessings to Varunaraja through Parjanyasukta nashik)

दिंडोरीत रविवारी (ता. १०) सेवेकरी-भाविकांशी संवाद साधताना ते बोलत होते. गेले तीन दिवस गुरुपीठात हवनयुक्त नवनाथ पारायण करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, की आपल्यासमोर आज जे विविध प्रश्न आणि लहान-मोठ्या समस्या, अडीअडचणी आहेत, त्याचे मूळ कारण म्हणजे आपणास पडलेला कुळधर्म, कुळाचाराचा विसर.

अनेक कुटुंबांमध्ये या मूलभूत गोष्टीबाबत आस्था न राहिल्याने आपली कौटुंबिक व्यवस्था भरकटली आहे. आधी कुटुंबातील जबाबदार महिला, पुरुषांनी यबाबत माहिती करून घेऊन ही कुळधर्म, कुळाचाराची जबाबदारी नवीन तरुण पिढीकडे सोपविणे खूपच गरजेचे आहे.

दिंडोरी येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या प्रधान केंद्रात रोजच भाविकांची रीघ असते; परंतु गुरुवार आणि रविवारी दिवसभरात सुमारे ५० हजार लोक दिंडोरी दरबारात येतात.

या उपस्थितांना गुरुमाउली वैयक्तिक व सामुदायिकरीत्या मार्गदर्शन करतात. आजच्या मार्गदर्शनात गुरुमाउलींनी कुळधर्म, कुळाचार या अत्यंत मूलभूत, महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा केली.

दर रविवारप्रमाणे आज सकाळी आरतीनंतर मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करण्यात आले. साडेदहाला गुरुमाउली यांनी मार्गदर्शन केले. दुपारी सर्वांनी पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. प्रश्नोत्तरे, मार्गदर्शन करणाऱ्या सेवेकऱ्यांचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

अनेक समस्या घेऊन आलेल्यांना हे सेवेकरी विनामूल्य मार्गदर्शन करताना दिसून आले. अवघड, गंभीर, गुंतागुंतीच्या प्रश्नांवर गुरुमाउलींनी स्वतः मार्गदर्शन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

किमान वर्षात एकदा कुलदेवतेला जा

कुळाचाराबाबत सर्वसामान्यांत अल्प माहितीमुळे खूपच गैरसमज दिसून येतात, असे सांगून गुरुमाउली म्हणाले, की आपले कालदैवत आणि कुलदेवता हे आपल्या कुटुंबाचे संरक्षण करतातच; पण कुटुंबाची समृद्धी, सुख, आरोग्यसंपन्नता याची काळजी घेतात, म्हणून त्यांचा नियमित मानसन्मान, सेवा आपल्या हातून घडायला हवी.

वर्षातून एकदा तरी खंडोबा आणि माता रेणुका, तुळजाभवानी, महालक्ष्मी, सप्तशृंगी यापैकी एक असलेल्या आपल्या कुलदेवतेला जाऊन त्यांचा मानसन्मान करावा.

असा करा कुलदैवताचा सन्मान

कुलदैवताचा मानसन्मान करण्याची अत्यंत साधी-सोपी पद्धतही गुरुमाउलींनी सांगितली. जेजुरीला जाऊन खंडोबास धोतर, उपरणे, सव्वा पाव- सव्वा किलो भंडारा आणि पुरणावरणाचा नैवेद्य द्यावा.

कुलदेवीस हिरवी साडी, चोळी, पुरणावरणाचा नैवेद्य द्यावा. मल्हारी सप्तशती आणि दुर्गा सप्तशती ग्रंथांचे पारायण करावे. एवढे जरी केले तरी आपणावर या दैवतांचा आशीर्वाद कायम राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT