Gurumauli Annasaheb More while guiding.  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : दिव्याने दिवा- ज्योतीने ज्योत लावा! : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : राष्ट्रहित आणि समाजाच्या भल्यासाठी श्री स्वामी सेवाकार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि दिव्याने दिवा व ज्योतीने ज्योत प्रज्वलित करा, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी गुरुवारी (ता. १०) केले.

श्रीक्षेत्र दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुवारी साप्ताहिक प्रश्नोत्तरे मार्गदर्शन आणि सत्संग समारोह सेवेकऱ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादात पार पडला. (Gurumauli Annasaheb More appeal Spread Shri Swami Sevekarya to maximum number of people nashik news)

या वेळी मानव व राष्ट्र कल्याणाबाबत गुरुमाउलींनी आपले विचार मांडले. गुरुमाउली म्हणाले, की सेवामार्गाने सदैव समाज आणि राष्ट्रहिताचाच विचार केला आहे.

विश्वशांती नांदावी, यासाठी सेवामार्गातर्फे आध्यात्मिक सेवा केली जाते. आज मानवाला सर्वांत जास्त मन:शांतीची गरज आहे. श्री स्वामी सेवेतून मन:शांती प्राप्त होते. जे सेवेकरी महाराजांची निष्काम सेवा करतात, त्यांचा सांभाळ महाराज करतात, असा अनुभव आहे. त्यामुळे आपण सेवा करताना इतरांनाही सेवामार्गात आणले पाहिजे.

त्याशिवाय दररोज आपण आत्मचिंतन करायला हवे. असे केल्याने आपले दोष कळू लागतात आणि आपण हळूहळू चुका सुधारू लागतो. मानवाने षडरिपूंरहित जीवन जगावे. मन आणि अंत:करण शुद्ध, निर्मळ, पवित्र आणि सात्त्विक ठेवायला हवे.

त्याप्रमाणे या जगातून जाताना केवळ पुण्य आपल्याबरोबर येणार आहे, हे त्रिवार सत्य ओळखून सेवेकऱ्यांनी पुण्यप्रद कार्य केले पाहिजे. आध्यात्मिक सेवेप्रमाणे दु:खी, कष्टी, पीडित, रोगीजनांची सेवाही करावी, असे विचार गुरुमाउलींनी मांडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मूल्यसंस्कार विभागावर बोलताना त्यांनी सांगितले, की वय वर्षे ५ ते १८ दरम्यानच्या मुलांवर संस्कार केले तर ती मुले भविष्यात संस्कारक्षम आणि आज्ञाधारक बनतात. आज राष्ट्राला अशा संस्कारक्षम पिढीची गरज आहे. सुसंस्कारित मुलांमुळे आई- वडिलांवर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येत नाही. कारण वृद्धाश्रम म्हणजे मानसिक जेल आहे.

आपले वार्धक्य सुखकारक जाण्यासाठी आणि आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मुलांना बालसंस्कार वर्गात पाठवा, अशी सूचना त्यांनी केली. आयुर्वेद, मराठी अस्मिता- भारतीय संस्कृती, विवाह, प्रशासकीय आदी विभागांवरही त्यांनी मार्गदर्शन केले.

कमला एकादशीला भागवत पारायण

अधिक श्रावण आणि कमला एकादशी (ता. ११)निमित्त सकाळी साडेदहाच्या आरतीनंतर एकाच दिवशी देश-विदेशात ऑनलाइन संक्षिप्त भागवत पारायण होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन श्रीक्षेत्र दिंडोरी प्रधान केंद्रातर्फे करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT