Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : आध्यात्मिक सेवेतून देशावरील संकटांचा मुकाबला : गुरुमाऊली

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : देशावरील संकटांचा आध्यात्मिक सेवेतून मुकाबला करा असे आवाहन श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांनी सेवेकऱ्यांना केले.

दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुवारी (ता. ३१) साप्ताहिक प्रश्‍नोत्तरे- मार्गदर्शन आणि सत्संग समारोह पार पडला. यावेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना गुरुमाऊलींनी संबोधित केले. (Gurumauli Annasaheb More guidance about problems of country through spiritual service nashik news)

अमृततुल्य हितगुजमध्ये गुरुमाऊली म्हणाले, राज्यात पावसाने ओढ दिली आहे. खरीप हंगाम वाया गेला. रब्बी हंगामही कोरडा गेला तर भयानक परिस्थिती निर्माण होईल.

अखिल जीवसृष्टीसह शेती आणि उद्योगांना मुबलक पाणी मिळायला हवे. मात्र सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी सेवेकऱ्यांनी नियमितपणे पर्जन्यसुक्ताचे पठण केले पाहिजे. इतर धर्मियांनी देखील आपापल्या प्रार्थनास्थळांवर जाऊन प्रार्थना करायला हवी. साऱ्याच जिवांना पाणी लागते म्हणून सर्वधर्मीयांनी प्रार्थना केली पाहिजे.

या जोडीला महावृक्षारोपण अभियानातही सहभागी झाले पाहिजे. अधिकाधिक रोपांची लागवड आणि संवर्धन होणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचे असंतुलन झाले आहे, याला मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड कारणीभूत आहे. त्यामुळे सेवामार्गाने सव्वा कोटी महावृक्षारोपण आणि संवर्धन हे अभियान हाती घेतले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ग्रामअभियानाच्या माध्यमातून गावागावात स्वामी कार्य पोहोचवा आणि गावे स्वावलंबी, सक्षम बनवा अशी आज्ञा त्यांनी सेवेकऱ्यांना केली. सामाजिक बांधिलकीतून विवाह मंडळांचे कार्य ग्रामीण भागात पोचवताना शहीद जवान आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला- मुलींच्या विवाहासाठी आर्थिक संपन्न कुटुंबियांनी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

सेवामार्गातर्फे १० सप्टेंबरला नांदेडमधील नायगाव येथे, ११ सप्टेंबरला लातूर येथे आणि १२ सप्टेंबरला पैठण येथे विवाह परिचय मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. संबंधितांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या हितगुजात त्यांनी श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेर यंत्र, भूकंपशांती यंत्र, वादळ शमन ध्वज यांचा वापर व फायदे याविषयी मार्गदर्शन केले.

कॅन्सर व इतर असाध्य आजारांवर आयुर्वेदिक औषधांची माहिती त्यांनी दिली. मूल्यसंस्कार, मराठी अस्मिता- भारतीय संस्कृती, प्रशासकीय, कायदेविषयक सल्लागार आदी विभागांची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पालखी सोहळा उत्साहात साजरा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT