Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : ग्रंथांच्या माध्यमातून संत, भगवंताला समजून घ्या : गुरुमाउली

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : ग्रंथसंपदा मानवाला अधिक प्रगल्भ बनविते, ज्ञानी बनविते. त्यामुळे ग्रंथ वाचून त्यातील विचारांचे मनन आणि चिंतन करणे गरजेचे आहे.

कारण ग्रंथ समजले, तरच संत समजतील आणि संत समजले, तर भगवंत समजेल, असे मार्मिक विश्‍लेषण श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी रविवारी (ता. ३) केले. (Gurumauli Annasaheb More guidance in satsang nashik news)

दिंडोरी प्रधानक्षेत्री रविवारी साप्ताहिक प्रश्‍नोत्तरे मार्गदर्शन आणि सत्संग समारोह झाला. यावेळी उपस्थित सेवेकऱ्यांना गुरुमाउलींच्या प्रासादिक आणि अमृततुल्य हितगुजाचा लाभ घडला. गुरुमाउलींनी अध्यात्मापासून राष्ट्र विकासापर्यंत आणि मानवाच्या सर्वांगीण विकासापासून ते विश्‍वक्रांतीपर्यंतच्या अनेक विषयांना स्पर्श केला.

गुरुमाउली म्हणाले, की भगवान शिवांची महाराष्ट्रावर विशेष कृपा आहे. कारण १२ पैकी पाच ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्याशिवाय आई भगवती पार्वती मातेची माहूर, तुळजापूर, कोल्हापूर आणि सप्तशृंग-वणी ही चार शक्तिपीठेही महाराष्ट्रात ऊर्जा देत आहेत.

शिवाचेच अवतार असलेले खंडोबा महाराज यांची महाराष्ट्रात चौदा पिठे असून, त्यामध्ये जेजुरी हे मुख्य शक्तिपीठ, तर २८५ उपपीठे आहेत. सेवेकऱ्यांना हे सर्व माहीत असावे, याकरिताच ही माहिती वारंवार सांगितली जाते, असे गुरुमाउलींनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सेवेकऱ्यांशी संवाद साधताना गुरुमाउलींनी सुवृष्टीसाठी पर्जन्यसूक्ताचे प्रत्येकाने पठण करावे, अशी स्पष्ट आज्ञा केली. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पर्जन्यसूक्त पठण केल्यास पर्जन्यदेवतेची निश्‍चितच कृपा होईल, असेही ते म्हणाले. समाज, देश आणि विश्‍वशांतीसाठी सेवामार्गाच्या अब्जचंडीचा गृहपाठ लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कॅन्सर मुक्तीची दवा सांगताना आहारातून वांगी, मिरची, उडीद, मका, वाटाणा हे पदार्थ वर्ज्य करण्याची सूचना त्यांनी केली. गुरुपीठ, पिठापूर, गाणगापूर व नरसोबाची वाडी येथील दत्तधामांवर अन्नदादासाठी आणि गोशाळेतील गायींना चारा देण्यासाठी सेवेकऱ्यांनी पुढे यावे, असे त्यांनी नमूद केले.

आपल्या हितगुजात त्यांनी मूल्यसंस्कार, विवाह, कायदेशीर सल्लागार, वास्तूशास्त्र, मराठी अस्मिता भारतीय संस्कृती, कृषी दुर्ग अभियान या विषयांशी मार्गदर्शन केले. त्यांच्या हितगुजानंतर पालखी सोहळ्यात सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ?

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT