Shri. Gurumauli Annasaheb More during guidance a main center of All India Swami Samarth Seva Marg on Thursday and servants from all over the state. esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : भारतीय स्त्री सद्गुणांची खाण : गुरूमाउली

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : ‘प्रेम, जिव्हाळा, सोशिकता, नम्रता, सुसंस्कृतपणा, कर्तव्यदक्ष असे अनेक सद्गुण आमच्या भारतीय माता, भगिनींमध्ये दिसतात. ती सद्गुणांची खाण आहे.

यामुळेच आपण राष्ट्रास सुद्धा भारत माता असे संबोधतो. जगभरात अमेरिका, जपान, चीन, जर्मनी असे स्वतःला बलाढ्य समजणारे अनेक देश आहे परंतु माता एकच आहे ती म्हणजे भारतमाता. ‘असे गौरवोद्गार गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी काढले. (Gurumauli annasaheb more guidance Indian Women Mine of Virtues nashik news)

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र दिंडोरी येथे श्री. स्वामी समर्थ व गुरुमाउलींच्या दर्शन व आशीर्वादासाठी देशभरातून आलेल्या आबालवृद्ध सेवेकरी, भाविकांशी हितगूज करताना गुरुमाउली आज बोलत होते.

नुकतीच गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी राज्यभर मोठ्याभाव, भक्तीच्या वातावरणात साजरी झाली असल्याने या सोहळ्यात जे भाविक, सेवेकरी सहभागी होऊ शकले नव्हते, ते आज दाखल झाल्याने दिंडोरी दरबार सकाळपासून संध्याकाळी आरती झाल्यानंतर सुद्धा गर्दीने फुलून गेला होता.

सकाळी भूपाळी आरती आधीच प्रश्नोत्तरे सेवेस प्रारंभ झाला. गुरुमाउली सकाळपासून येणाऱ्या सेवेकरी, भाविकांना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करताना दिसले. साडेदहा वाजेची आरती झाल्यानंतर गुरुमाउलींनी उपस्थितांशी सामुदायिक हितगूज केले. त्यात त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला. भारतीय नारीचा विशेष गौरव त्यांनी केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भारतीय- मराठी अस्मिता, संस्कृती विशेषतः आमच्या माता भगिनींनी जिवंत ठेवली आहे. त्यांच्या त्यागावरच ही संस्कृती, अस्मिता टिकून आहे आणि संवर्धित होत आहे. असे गुरुमाउली म्हणाले.

दुष्काळ सदृश परिस्थिती बाबत पुन्हा चिंता व्यक्त करून त्यांनी पर्जन्यसुक्ताची सेवा सर्वत्र घरोघरी, केंद्रात, मंदिरात व्हावी. पर्जन्यराजास सर्वांनी आर्ततेने हाक द्यावी, त्याशिवाय तो येणार नाही, असे आवाहन त्यांनी केले.

शाकाहार, सदाचार यावर सुद्धा गुरुमाउलींनी मार्गदर्शन केले. मद्यपान, मांसाहार, व्यसन, वाईट गोष्टी कुणाला शिकवाव्या लागत नाहीत. त्यांच्या आहारी माणूस सहजपणे जातो पण चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. सेवेकऱ्यांनी स्वतः शाकाहारी, निर्व्यसनी, सदाचारी होऊन इतरांना तसे बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही गुरुमाउलींनी दिला. आजही दुपारी पालखी सोहळ्याचा आनंद सेवेकऱ्यांसह भाविकांनी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT