Gurumauli Annasaheb More esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : नवनाथांच्या कृपेने जीवनसृष्टीचा शुभाशीर्वाद : गुरुमाउली

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : नवनाथांच्या हवनात्मक सर्वोच्च सेवेमुळे देशभरात सुवृष्टी होऊन अखिल जीवसृष्टीला शुभाशीर्वाद मिळतील, असा विश्‍वास अखिल भारतीय श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली श्री आण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला.

श्री स्वामी सेवामार्गातर्फे त्र्यंबकेश्वर येथील श्री गुरुपीठात तीनदिवसीय सामुदायिक हवनात्मक नवनाथ पारायण आणि श्रीदत्त नवनाथ पूजन सोहळा सुरू झाला आहे. (Gurumauli Annasaheb More guidance nashik news)

शनिवारी (ता. ९) साप्ताहिक सत्संग समारोहात परमपूज्य गुरुमाउलींचे अमृततुल्य हितगूज झाले. या वेळी सेवेकऱ्यांना मार्गदर्शन करताना गुरुमाउली म्हणाले, की यापूर्वी नवनाथांनी ब्रह्मगिरीवर जीवनसृष्टीच्या उद्धारासाठी आध्यात्मिक सेवा केली होती आणि त्यांच्या सेवेमुळे जनतेचेही कल्याण झाले होते.

आता त्याच सर्वशक्तिमान आणि देवांनाही अजिंक्य असलेल्या नवनाथांची आपण राष्ट्रकल्याण आणि जीवनसृष्टीसाठी हवनात्मक सेवा करीत आहोत. या सेवेमुळे नवनाथांची अवश्य कृपा होईल, असे गुरुमाउलींनी नमूद केले.

गुरुमाउली म्हणाले, की निसर्ग कोण्याचा ताब्यात नाही. मात्र, खऱ्या भक्तांच्या हाकेला त्याला धावून यावेच लागते. त्यापुढे देशभर सृवृष्टीला श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून सुरवात झाली आहे, याकडे त्यांनी सेवेकऱ्यांचे लक्ष वेधले. यापूर्वीही सेवामार्गातर्फे राष्ट्र अन्‌ मानव कल्याणासाठी द्वारका, नैमिषारण्य आदी ठिकाणी आध्यत्मिक सेवा घेण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कारण राष्ट्राचे संरक्षण आणि अखिल जीवसृष्टीचे कल्याण हेच सेवामार्गाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठीच सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून ग्राम व नागरी विकास अभियान राबविले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपस्थित मुंबईकर सेवकऱ्यांचे कौतुक करताना मुंबईकर प्रसंगानुसार वेळेचे भान ठेवून सामुदायिक सहजीवनाचा आनंद घेतात. या आनंदातूनच सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, असे ते म्हणाले.

आपल्यातील गुण-दोष नाहीसे करण्यासाठी दररोज रात्री झोपताना श्री स्वामी महाराजांना विनंती करा, असे सांगतानाच सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काय करावे व काय टाळावे, याची माहिती गुरुमाउलींनी दिली. मूल्यसंस्कार, शेती, समुपदेशन, विवाह, प्रशासकीय, पर्यावरण, कायदेशीर सल्लागार या विभागांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी गुरुमाउली चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे हेही उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

Swiggy IPO: स्विगीचा 11,327 कोटी रुपयांचा IPO उघडला; गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचे मत?

Latest Marathi News Updates live : पुण्यात मित्र पक्षाला एकत्र घेत महायुतीची रणनीती ठरली

IPL Mega Auction 2025: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह २३ भारतीय खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये; कोणाला हाय डिमांड?

Raj Thackeray: मुंबईत मनसे फॅक्टर ठरणार निर्णायक; बदललेली भूमिका वाढवतेय महायुतीची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT