Gurumauli Annasaheb More guiding the devotees at Shri Swami Samarth Seva Marg Gurupeeth in Shri Kshetra Trimbakeshwar esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : राष्ट्रभक्तीसह दीन, दुःखी, पीडितांची सेवा करा : गुरुमाउली

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : शरीर चंदनाप्रमाणे झिजवून सेवेकऱ्यांनी राष्ट्रभक्तीसह दीन, दुःखी अन् पीडितांची सेवा करावी आणि घेतला वसा सोडू नये, असा उपदेश अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी आज येथे केला. (Gurumauli Annasaheb More guidance Serve downtrodden distressed afflicted with patriotism nashik news)

सेवामार्गाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला आहे. परमपूज्य गुरुमाउली यांच्या पावन उपस्थितीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात ३० जून व १ जुलै, असा गुरुदर्शन सोहळा सेवेकऱ्यांच्या अभूतपूर्व उपस्थितीत पार पडला. देशभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना दुसऱ्या दिवशीही गुरुमाउलींनी संबोधित केले.

गुरुमाउली म्हणाले, की आज हजारोंच्या संख्येने नूतन सेवेकरी स्वामींची सेवा करण्यासाठी वचनबद्ध झाले आहेत. सेवामार्गात येणे आणि जाणे अतिशय सोपे आहे. मात्र टिकून राहणे अतिशय अवघड आहे.

आज जे सेवेकरी आले आहेत ते शतजन्माची पुण्याई घेऊन आले आहेत. अशा भाग्यवान सेवेकऱ्यांनी आपल्या पुण्याईच्या बळावर दु:खी-कष्टी लोकांची सेवा करावी, सेवामार्गाच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करून नित्यसेवा करावी आणि स्वामींचे सेवाकार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावे, असे आवाहन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गुरुमाउलींनी आपल्या हितगुजातून उच्च गुरुभक्तीचे अनेक दाखले दिले. गुरुमाउलींनी दधिची ऋषींचा देहत्याग, परमपूज्य पिठले महाराजांचे आजन्म सेवाव्रती कार्य, एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपात राहून भगवान श्रीकृष्णाने केलेली सेवा, भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे अलौकिक कार्य याविषयीचे सविस्तर विवेचन केले.

गुरुमाउली म्हणाले, की दधिची ऋषींच्या देहत्यागानंतर त्यांच्या हाडांची वज्रे तयार करून देवांनी असुरांचा पराभव केला आणि विजयश्री प्राप्त केली. असा त्याग आणि याच तोडीचे सेवाकार्य परमपूज्य सदगुरू पिठले महाराजांनी आजन्म केले. संत शिरोमणी एकनाथ महाराजांच्या निस्सीम भक्तीमुळे त्यांच्या घरी भगवान श्रीकृष्णांनी देखील श्रीखंड्याच्या रूपात राहून १२ वर्षे सेवा केली.

आजही भगवान श्रीकृष्ण गुप्तरुपाने येऊन पैठणचा रांजण भरून जातात. भगवान श्रीकृष्णांना महाभारतकारांनी २६ पदव्या दिल्या आहेत, तर रामायणकारांनी ‘मर्यादा पुरुषोत्तम’ ही दिव्य पदवी प्रभू श्रीरामांना दिली आहे.

संत आणि अवतारी विभूतींचा जीवनादर्श सेवेकऱ्यांनी अंगीकारावा, असे गुरुमाउलींनी नमूद केले. मूल्यशिक्षण, विवाह मंडळ, कृषी, आयुर्वेद, मराठी अस्मिता-भारतीय संस्कृती, वास्तुशास्त्र आदी महत्त्वपूर्ण विषयांवरही गुरुमाउलींनी मार्गदर्शन केले. या वेळी चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे हेही उपस्थित होते.

गुरुदर्शन अन् शनिप्रदोष

गुरुचरित्र या दिव्य ग्रंथामध्ये शनिप्रदोष माहात्म्य वर्णिले आहे. शनिवारी (ता. १) शनिप्रदोषदिनी हजारो सेवेकऱ्यांना गुरुमाउलींचे दर्शन आणि आशीर्वादाचा लाभ घडला. गुरुमाउलींनीही आपल्या हितगूजमध्ये शनिप्रदोष पर्वावर गुरुदर्शन घेणारे सेवेकरी महत पुण्यवान आहेत, असा उल्लेख केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षिस; कोण आहे अनमोल बिश्नोई?

Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT