Gurumauli Annasaheb More : समर्थ सेवेकऱ्यांनी अत्यंत श्रद्धेने सामुदायिकपणे केलेल्या अतिरुद्र लिंगार्चन आणि ललिता सहस्रनाम पठणाच्या सेवेमुळे भगवान श्री.पशुपतिनाथ, आदिशक्ती श्री.गुह्येश्वरी माता आणि महायोगी श्री.गोरक्षनाथांच्या कृपेमुळे नेपाळसह संपूर्ण जगात विश्वशांती नांदेल आणि संपूर्ण मानव समाज सुखी-संपन्न अन् समृद्ध होईल, असा विश्वास अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ सेवामार्गाचे गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला. (Gurumauli Annasaheb More statement By grace of Pashupatinath there will be peace in whole world nashik news)
अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने नेपाळमधील श्रीक्षेत्र पशुपतिनाथ येथे अतिरुद्रात्मक रुद्राक्ष लिंगार्चन तथा ललिता सहस्रनाम पठण या अतिउच्च आध्यात्मिक सेवेचा अंतर्भाव असलेला आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळा शनिवारी (ता.१०) सेवेकऱ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादामध्ये पार पडला. भारत, नेपाळसह संपूर्ण जगभरातून मोठ्या संख्येने आलेल्या सेवेकऱ्यांना गुरुमाउलींनी संबोधित केले. नेपाळचे उपराष्ट्रपती रामसहाय प्रसाद यादव यांची या सोहळ्याला उपस्थिती होती.
गुरुमाउलींनी आपल्या हितगुजामध्ये नेपाळचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, नेपाळला आध्यात्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. सत्ययुगात आदिमाया पार्वतीसह भगवान शिव या पुण्यभूमीत प्रकटले. भगवान पशुपतिनाथांचे दर्शन घेतल्याशिवाय श्री.केदारनाथ यात्रा पूर्ण होत नाही. महायोगी श्री.मच्छिंद्रनाथ व सिद्धयोगी श्री.गोरक्षनाथ यांची ही कर्मभूमी आहे.
श्री.सीतामाता याच भूमीत जनकपूरमध्ये प्रकटली. जनकपूर ही राजा जनकाची भूमी आहे. तर संपूर्ण विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची लुंबीन ही जन्मभूमी आहे. श्री. कामेश्वरीनंतर प्रचंड शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या श्री. गुह्येश्वरी मातेचे पवित्र स्थानही याच भूमीत आहे. गौतम ऋषींचा आश्रम आणि उत्तरवाहिनी गंगामातेमुळे या भूमीचे महत्त्व शब्दातीत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
द्वापारयुगात एका असुराचा वध भगवान श्रीकृष्णांनी याच भूमीत केला. वासुकी व कर्कोटक या नागांचीही ही पुण्यभूमी आहे. त्यामुळे देवदेवतांच्या वास्तव्यामुळे ही भूमी प्रतिस्वर्ग ठरली आहे अशा शब्दात परमपूज्य गुरुमाऊलींनी नेपाळच्या आध्यात्मिक शक्तीपीठांचा गौरव केला आहे.
सेवामार्गामुळे आध्यात्मिक संबंध अधिक मजबूत
अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवामार्गामुळे नेपाळ- भारताचे आध्यात्मिक संबंध अधिक मजबूत आणि शक्तिशाली होतील, असा विश्वास नेपाळचे उपराष्ट्रपती रामसहाय प्रसाद यादव यांनी आपल्या शुभेच्छा देताना व्यक्त केला. ते म्हणाले की, पौराणिक काळापासून भारत आणि नेपाळचे आध्यात्मिक संबंध आहेत.
नेपाळची आदिशक्ती सीतामातेचे पंचवटीत वास्तव्य होते. योगी श्री. गोरक्षनाथांनी नेपाळप्रमाणेच भारतातही मानव उद्धाराचे कार्य केले. आता सेवामार्गाने नेपाळमध्येही सेवाकार्य सुरु केले याचा विशेष आनंद वाटतो. आज भगवान शिव आणि शक्ती यांची अतिउच्च सेवा झाली. याबद्दल श्री. स्वामी समर्थ सेवामार्गाचे मी विशेष आभार मानतो. या मानवतावादी कार्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, असे उपराष्ट्रपती यादव यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
- जगभरातून आलेल्या समर्थ सेवेकऱ्यांनी अतिरुद्रात्मक रुद्राक्ष लिंगार्चन आणि श्री. ललिता सहस्रनाम पठणाच्या अतिविशेष सेवेत सहभाग. - - सेवेकऱ्यांकडून आपापल्या घरून आणलेल्या शिवपिंडीवर अभिषेक.
- देश-विदेश अभियानचे प्रमुख नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनात दुबईनंतर नेपाळमध्ये हा दुसरा आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळा.
- रुद्राक्षांनी तयार केलेल्या शिवलिंगाचे गुरुमाउली, उपराष्ट्रपती रामसहाय प्रसाद यादव, नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते विधिवत पूजन.
- शांती मंत्र म्हणत दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात.
- मान्यवरांचे नेपाळी टोपी घालून, शाल पांघरून आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ घालून अनोख्या पद्धतीने स्वागत.
- सभामंडपात टाळ्यांचा दीर्घकाळ कडकडाट.
- कार्यक्रम समितीचे अध्यक्ष अभिराज आचार्य व नेपाळमधील सेवेकऱ्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक सत्संग सोहळा यशस्वी केल्याबद्दल गुरुमाउलींकडून कौतुक.
- व्यासपीठावर सतीश मोटे, पल्लवी मोटे आदि मान्यवरांची उपस्थिती
- पूजन झालेल्या अभिमंत्रित रुद्राक्षांचे वितरण जूनच्या मासिक सत्संगात प्रवेशपत्रानुसार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.