Gurumauli Annasaheb More : भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सेवेकऱ्यांनी ग्राम अभियानाच्या माध्यमातून भक्ती, ज्ञान आणि कर्माचा त्रिवेणी संगम साधावा, असे आवाहन अखिल भारती श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली श्री अण्णासाहेब मोरे यांनी केले.
शनिवारी (ता. १२) श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री गुरुपीठात आयोजित साप्ताहिक सत्संग समारोहात गुरुमाउली बोलत होते. (Gurumauli guidance about Bhakti gyan Karma nashik news)
ते म्हणाले, की सेवामार्गाने सदैव राष्ट्रहित आणि विश्वशांतीला प्राधान्य दिले आहे. सेवामार्गाचे सर्व उपक्रम सामाजिक आणि राष्ट्रीय विकासासाठी होत असतात. तर ग्राम अभियानाच्या माध्यमातून सेवेकरी गावागावात जाऊन दुःखी, पीडित, आर्त, रोगी, अज्ञानी जणांसाठी सेवाकार्य करतात आणि समाजाला जागे करतात.
ग्राम अभियान आता अधिक जोमाने करावे, अशी आज्ञा गुरुमाउलींनी केली. राष्ट्रहित आणि विश्वशांतीसाठी ११ ऑगस्टला एकाच दिवशी जगभरात घेतलेल्या ऑनलाइन संक्षिप्त भागवत पारायणात एक लाख ३८ हजार सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला, तर शनिवारच्या गुरुपीठातील एकदिवसीय सामुदायिक गुरुचरित्र पारायणात ४५० सेवेकऱ्यांनी सेवा रुजू केली, अशी माहिती त्यांनी दिली.
ग्राम अभियान अधिक बळकट होण्यासाठी गाणगापूर, नृसिंहवाडी, शेगाव आदी ठिकाणी होणाऱ्या विभिन्न विभागांच्या प्रशिक्षणात सेवेकऱ्यांनी आवर्जून सहभागी झाले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
देशभरातील वृद्धाश्रमांची संख्या घटली पाहिजे. त्याकरिता आजची पिढी सुसंस्कारित होणे अत्यंत गरजेचे आहे.
सेवामार्गाचा मूल्य संस्कार विभाग त्यासाठी प्रयत्नशील आहे, असे सांगताना आदर्श, सदाचारी आणि निर्व्यसनी व सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, अशी हाक त्यांनी दिली. पर्जन्यसूक्त, ऐक्यमंत्र, स्वसंरक्षण यंत्र, वादळ शमन ध्वज यांचे महत्त्व सांगताना गुरुमाउलीनी मनःशांतीसाठी आध्यात्मिक सेवा करण्याचा संदेश दिला.
शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी शेतीला राष्ट्रीय उद्योगाचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी केली. आयुर्वेदावर बोलताना गुरुमाउली यांनी डोळ्यांचे विकार आणि असाध्य आजारांवर आयुर्वेदिक दवा सांगितला. जागतिक तापमानवाढीचा धोका ओळखून सर्वांनी सव्वा कोटी महावृक्षारोपण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.