Gutkha consuming esakal
नाशिक

Nashik News : जिल्हयात गुटखा बंदीच्या नावाखाली दुप्पट ते तिप्पट दराने विक्री!

पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांनी जिल्हयातील सर्वच अवैद्य धंदे बंद करण्याचे फर्मान काढले. यामुळे अनेक ग्रामीण भागात गावठी दारूला आळा बसला. काही भागात मटक्याचे धंदे देखील बंद झाले, त्याचबरोबर गुटखा विक्री बंद झाली. दुसरीकडे हाच गुटखा आजही चढ्या भावाने सहज मिळत आहे. त्यामुळे ही कारवाई वरवरचीच असल्याचे दिसून येते. या गुटख्याची पाळेमुळे उखडून काढणार कधी असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत. (Gutkha sold at double to triple price in district Nashik News)

एकीकडे जिल्हयात अनेक भागात गुटखा कमी जास्त भावाने मिळतो. मात्र नाशिक शहरात कुठही फिरलेतरी सहजपणे गुटख्यांच्या पुड्या मिळतात. मग शहर आणि ग्रामीण भागात पोलिसांचच दुजाभाव आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक नागरिक मटका खेळण्यासाठी दररोज नाशिक शहरात येतात, ही चर्चा आता ग्रामीण भागात रंगली आहे.

या आधी शहराबरोबरच ग्रामीण भागातही गुटख्याचे जाळे केबल नेट्वर्कप्रमाणे पसरले होते. तरूणांमधील वाढती व्यसनाधीनता चिंतेची बाब ठरू पाहत आहे. जेवढी कडक बंदी तेवढ्या उंच भावाने आणि जोरदार पद्धतीने सर्रास गुटखा विक्रीचा गोरखधंदा जिल्हयात मात्र जोमात सुरु आहे.

नाशिक शहराच्या म्होरक्याच्या अधिपत्याखाली त्यांचे पंटर जिल्हयात दुचाकींने दुकाने, पानटपऱ्या याठिकाणी गुटखा पोहोच करण्याचे काम करतात. प्रशासनाने बंदी घातली खरी मात्र त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. बड्यांच्या अर्थरूपी आशीर्वादाने हे गुटखाचक्र जोरात धावताना पाहायला मिळत आहे.

आजपर्यंत ज्या कारवाया झाल्या आहेत, त्या छोट्या विक्रेत्यांवरच झालेल्या पाहायला मिळतात. बडे मासे गळाला लागलेले दिसत नाही.

कोरोना काळात हा अवैध व्यवसाय आणखी जोमाने आणि चढ्या भावाने विस्तारला गेला. कारवाईची चाहूल लागताच गोदामाची गोदामे गायब होतात. ही माहिती पुरवणारे प्रशासनातील ते गद्दार कोण ? याची माहिती घेणही आवश्यक आहे.

गुटखा पुरवणारे बडे मासे आणि त्यांची नावे सर्वपरिचित असतानाही प्रशासन त्यांच्यावर कारवाई का करत नाही. कदाचित कारवाई झालीच तर हे मुजोर गुटखा पंटर आजारपणाच्या नावाखाली अर्थपूर्ण तडजोडीतून दवाखान्यात भरती होऊन बचाव करतात.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

जेवढे नियम कडक तेवढा हा गोरखधंदा गडद असं आजपर्यंत स्थितीतून समोर आले आहे. बंदी आहे असं सांगून ग्राहकांना अव्वाच्यासव्वा दराने म्हणजे जवळपास दुप्पट ते तिप्पट दराने या अवैध गुटखा विक्री केली जाते.

मुलांच्या मदतीने विक्री

ग्रामीण भागात काही अल्पवयीन मुले जुन्या मोटारसायकलवर पान टपऱ्या, दुकाने, हॉटेल यांना गुटख्याची विक्री करतात. यात मुख्य म्होरक्या मात्र पडद्याआडच असतो. कारवाई झाली तरी त्या गरीब विक्रेत्यांवर होते आणि मुख्य सूत्रधार मोकटच फिरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT