crime news  esakal
नाशिक

Nashik Crime News : गुटख्याची वाहतूक करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सटाणा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील गव्हाणपाडा येथे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या युवकाला अटक केली असून त्याच्याकडून वाहनासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. (Gutkha transporter arrested nashik crime news)

डांगसौंदाणे (ता.बागलाण) येथील वैभव रामदास देवरे (वय २४) हा युवक सफेद रंगाच्या महिंद्रा पिकअप (एम.एच.४१ ए.यु.३४२३) या वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती किरण पाटील यांना मिळाली होती.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्यानुसार श्री.पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिस शिपाई अशोक चौरे, बेनुस्कर, कोकणी, पोलिस हवालदार जीभाऊ पवार आदींच्या पथकाने डांगसौंदाणे - साल्हेर रस्त्यावरील गव्हाणपाडा फाटा येथे वैभव पवार याला वाहनासह ताब्यात घेतले.

त्यात ४३ हजार ५०० रुपये किमतीचा विमल पान मसाला ४ हजार ८४० रुपये किमतीच्या तंबाखू पुड्या आणि चारचाकी असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत संशयितास ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News: विनोद तावडेंना अडचणीत आणणाऱ्या हितेंद्र ठाकूरांचा उमेदवार भाजपने पळवला, मतदानाच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणील ब्रेक; सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Updates : डहाणूत बहुजन विकास आघाडीला धक्का; बविआच्या उमेदवाराचा भाजप प्रवेश

आर्या-निक्कीमध्ये पुन्हा राडा ! निक्कीने आर्याला 'मोठा हाथी' म्हणत केली टीका तर आर्या म्हणाली...

Vinod Tawde : 'आप्पा ठाकूर आणि क्षितिज मला ओळखतात पण...' विनोद तावडेंनी CCTV फुटेजची मागणी, विवांता हॉटेलमध्ये काय घडलं ?

SCROLL FOR NEXT