मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील जाफर नगर भागातील हलिमा मशिदीच्या पाठीमागे असलेल्या इम्रान नामक यंत्रमाग कारखानदाराच्या पत्र्याच्या शेडमध्ये सहाय्यक पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या विशेष पथकाने छापा टाकून सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याच पथकाने आयेशानगर पोलिसांच्या मदतीने खूनाचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. (Gutkha worth 2 lakh seized 2 criminals arrested Nashik Crime News)
पोलिस अधीक्षक शहाजी उमप, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पिराजी वाघमोडे, इम्रान सय्यद, दिनेश शेरावते आदींच्या पथकाने ही कारवाई केली. हलिमा मशिदीच्या पाठीमागे इम्रान याच्या पांढऱ्या रंगाच्या पत्र्याच्या शेडमधील यंत्रमाग कारखान्यात छापा टाकला.
यात अवैधरीत्या साठवून ठेवलेला दोन लाख २४ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला मिळून आला. पोलिसांनी गुटखा जप्त केला असून एका संशयिताविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
दरम्यान याच पथकाने शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या अमान सिराज बेग ऊर्फ अब्बु (वय २०, रा. आयशानगर स्वीपर कॉलनी) याला कालीकुट्टी येथील दरगाहच्या परिसरात फिरत असताना अटक केली. अब्बुला आयशानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच, शासकीय कामात अडथळा आणणे व सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या अक्रम शेख आरिफ ऊर्फ अज्जु लस्सन (वय ३०, रा. गणेशनगर कुसुंबारोड) हा जुना मुंबई आग्रा हायवेवरील सुपर मार्केट येथील चहाच्या टपरीवर बसलेला असल्याची माहिती मिळाली. पथकाने सुपर मार्केट भागात जाऊन त्यास अटक केली. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.