Gutkha seized esakal
नाशिक

Nashik Crime News: पांगरी येथे 40 हजारांचा गुटखा जप्त; जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखुची अवैध विक्री होत असल्याने पांगरी (ता. सिन्नर) येथील एका किराणा दुकानावर जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईत सुमारे ३८ हजार ७०० रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Gutkha worth 40 thousand seized in Pangri action of special team of District Superintendent of Police Nashik Crime News)

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. उमाप यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी विशेष पथक कार्यरत केले आहे. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, शिपाई महेश सोनवणे, दत्तू दराडे, भूषण मोरे, सीमा पवार, ज्ञानेश जाधव, संतोष पागी हे वावी पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी (ता. ८) दुपारी पेट्रोलिंग करत होते.

त्यावेळी त्यांना पांगरी येथील माऊली किराणा व जनरल स्टोअर्स या दुकानात प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व पान मसाल्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात खातरजमा करून घेतल्यानंतर स्थानिक दोन व्यक्तींना पंच म्हणून सोबत घेत सायंकाळी चारच्या सुमारास पथकाने संबंधीत दुकानावर छापा टाकला.

दुकान मालक संजय आनंदा पांगारकर यांनी सुरवातीला झडती घेऊ देण्यास विरोध केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पंचांसमक्ष दुकानाची झाडाझडती घेतली असता ७ हजार ४८८ रुपये किमतीचा प्रिमीयम राज निवास सुगंधीत पान मसाला, ४ हजार ४४० रुपयांचा हिरा पान मसाला, ३ हजार ८८८ रुपयांचा रजनीगंधा सुगंधीत पान मसाला,

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

२ हजार १३४ रुपयांची व्ही-१ तंबाखु पाकिटे, १३ हजार ६६२ रुपयांचा केसरयुक्त विमल पान मसाला, १ हजार ५६८ रुपये किमतीची तुलसी रॉयल तंबाखू व १ हजार ४४० रुपयांचा प्रिमीयम आरएमडी पानमसाला असा ३८ हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल सापडला.

पोलीस उपनिरीक्षक श्री. वाघमारे यांनी मुद्देमाल व किराणा दुकान मालक पांगारकर यांना वावी पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी पथकातील पोलीस नाईक संतोष पागे यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून, जप्त केलेला मुद्देमाल व संशयितास वावी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT