नाशिक : म्हसरुळ येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील अत्याचार प्रकरणी नराधम संस्थाचालक हर्षल मोरे यास पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. त्यास न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. १४) पोलिस कोठडी सुनावली आहे. मोरे याने अल्पवयीन मुलीस एअरगनचा धाक दाखवून अत्याचार केल्याचे समोर आले होते. या तपासासाठी पोलिसांनी मोरेच्या कोठडीची मागणी केली होती. दरम्यान, मोरे यांच्याविरोधात अत्याचाराचे सात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आल्याने त्याचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. (Gyandip Gurukul Crime Case More remanded in police custody in torture case 7 separate cases filed Nashik Crime News)
म्हसरुळ परिसरातील मानेनगरमध्ये असलेल्या दि किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील सात मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे (३२) यांच्याविरोधात पोक्सो अन्वये बलात्कार आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या गुन्ह्यातील कोठडीची मुदत संपल्यानंतर मोरे न्यायालयीन कोठडीत होता. मोरे यांच्या बागलाण येथील राहत्या घरातून पोलिसांना एअर गन सापडली होती.
सदरील एअर गनचा धाक दाखवून त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या गनचा धाक दाखवून अत्याचार केले आहेत का, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी संशयित मोरे यास पुन्हा ताब्यात घेतले. न्यायालयात गुरुवारी (ता. ८) हजर करीत पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने संशयित मोरे यास येत्या १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रीय महिला व बाल कल्याण विभागाच्या बाल संरक्षण हक्क विभागाच्या समितीने याप्रकरणाची चौकशी केली आहे. अत्याचार पीडित मुलींची या समितीने भेट घेत चर्चा केली. तसेच तपासी अधिकाऱ्यांची भेट घेत या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.
अहवाल तपासासाठी महत्त्वपूर्ण
संशयित मोरे याच्या घरातून एक एअरगन शहर पोलिसांच्या हाती लागली होती. सदरची गन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठविली आहे. यासंदर्भातील अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. या गनच्या अहवाल पोलिस तपासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच, धर्मादाय आयुक्तांनाही आश्रमावर कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांनी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.