Nashik News : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल विभागाने नाशिक-पुणे महामार्गावरील अपना गॅरेज परिसरातील सरस्वती नदीपात्रालगत असलेल्या ४० दुकानांचे अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेस मंगळवारी (ता. ७) प्रारंभ केला.
सायंकाळपर्यंत अतिक्रमण निर्मूलन पथकाने सुमारे १३ दुकाने जमीनदोस्त केली होती. या धडक कारवाईमुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला. (Hammer on encroachment along Saraswati River Revenue Department police action in Sinnar Nashik News)
सरस्वती नदीपात्रालगत शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत अनेक व्यावसायिकांनी पत्र्याचे शेड व पक्की बांधकामे करून दुकाने थाटली आहेत. ती जागा शासकीय असून, त्याचा सर्व्हे नंबर ६३०/अ-१ आहे.
राज्यभरातील शासकीय जागेवरील अतिक्रमणे काढण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश दिले असून, शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना दिल्या.
प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने अतिक्रमण मोहीम राबविली. अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी जुलैमध्ये नोटिसा बजावल्या होत्या.
त्यानंतर पुन्हा नोटिसा बजावण्यात आल्या. . ६ नोव्हेंबरपर्यंत अतिक्रमणधारकांनी आपल्या दुकानातील साहित्य काढून घेण्याच्या सूचना त्यात केल्या होत्या. काही व्यवसायिकांनी दुकानातील माल घरी नेला होता.
मुदत संपल्यानंतर मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तहसीलदार सुरेंद्र देशमुख, नायब तहसीलदार सागर मुंदडा, पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्यासह अधिकाऱ्यांचा ताफा मोठा पोलिस फौजफाटा घेऊन आला.
दुकानदारांनी साहित्य हलवले नसल्याने त्यांची धांदल उडाली. सायंकाळपर्यंत सुमारे १३ दुकाने पाडली होती. अजून एक-दोन दिवस अतिक्रमण मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती तहसीलदार देशमुख यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.