Women fetching water from the well here esakal
नाशिक

Nashik News : खैरेवाडी येथील महिलांच्या डोक्यावर हंडा; नळपाणी पुरवठा पूर्ववत चालू करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

वाडीवऱ्हे (जि. नाशिक) : भविष्यात पाणी पुरणार नाही पाणी टंचाई येईल असे कारण देऊन इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे ग्रामपंचायतीतील खैरेवाडी येथील विहिरीवरीवरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या वीज पुरवठ्याने सुरु असलेली नळपाणी पुरवठा बंद केल्याने महिलांना विहिरीवरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे.

पाणी पुरवठा विभाग व ग्रामसेवकांनी सौर वीजपुरवठा सुरळीत करून नळपाणी पुरवठा पूर्ववत चालू करावा अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली आहे. अन्यथा एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी पंचायत समितीवर महिला हंडा मोर्चा आणतील असा इशारा दिला आहे. (Hand over heads of women in Khairewadi Demand for restoration of tap water supply Nashik News)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

खैरे वाडी येथे कायम पाणी टंचाई होती. महिलांचे डोक्यावरून पाणी आणण्याचे हाल बघून एका स्वयंसेवी संस्थेने वाडीला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीवर सौर ऊर्जा प्रकल्पावर नळपाणी पुरवठा योजना राबविली. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला. मात्र महिलांच्या चेहऱ्यावरील हा आनंद फार काळ टिकला नाही.

नळपाणी पुरवठा योजना सुरु राहिली तर पाणी पुरणार नाही. पाणी टंचाई येईल असे कारण सांगत इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील सौरऊर्जा प्रकल्पावर चालु असलेली विहिरीवरील नळपाणी पुरवठा योजना पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाने बंद केली आहे. या वाडीला पाणी मिळावे यासाठी ग्रामस्थांनी शेकडो वेळा आंदोलने केली आहेत.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT