Gangadhar Pathak esakal
नाशिक

हनुमान जन्मस्थळ वाद : शास्त्रार्थ चर्चेला रामजन्मभूमीचे प्रमुख आचार्य

महेंद्र महाजन

नाशिक : अयोध्येमधील रामजन्मभूमीचे (Ayodhya Ramjanmabhumi) प्रमुख आचार्य गंगाधर पाठक नाशिकमध्ये कसे आले, हा प्रश्‍न नाशिककरांप्रमाणे वेदशास्त्रसंपन्न शांतारामशास्त्री भानोसे यांनाही पडला होता. श्री. भानोसे यांनी श्री. पाठक यांच्याशी संवाद साधला, तेव्हा अयोध्येमध्ये किष्किंधाचे स्वामी गोविंदानंद सरस्वती आले असताना त्यांची भेट झाली होती आणि हनुमान (hanuman) गढी ट्रस्टच्या महंतांनी किष्किंधासाठी (Kishkindha) पाठिंबा दिल्याचे पत्र स्वामींना दिल्याचे उत्तर श्री. पाठक यांनी दिले. त्यावरून नाशिककरांचा किष्किंधासाठी पाठिंबा मिळेल म्हणून श्री. पाठक नाशिकमध्ये आले होते, असे दिसते. (Hanuman Birthplace controversy Nashik News)

शास्त्रार्थ सभेत स्वामींनी संस्कृतमधून अयोध्या ही एक रामजन्मभूमी झाली, तसे किष्किंधा हे एक हनुमान जन्मस्थळ व्हावे, यासाठी आपली भ्रमंती सुरू असून, त्यातून हिंदू धर्मातील भ्रम निघून जाईल, असा विश्‍वास मांडला होता. नेमका हाच मुद्दा शांतारामशास्त्री यांना खटकला होता. त्यावर शांतारामशास्त्री उत्तर देऊ इच्छित होते. दावे-प्रतिदावे आणि गोंधळात त्यांना सविस्तर बोलणे शक्य झाले नाही. मात्र शांतारामशास्त्रींनी अंजनेरीमधील हनुमान जन्मस्थळविषयक ब्रह्मपुराणातील ८४ व्या अध्यायातील १२ वा श्‍लोक वाचून दाखविला होता. त्याच क्षणी श्री. पाठक यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या पुराणांच्या पीडीएफ पाहिल्या आणि ते अवाक झाल्याचा भाव शांतारामशास्त्री यांच्या नजरेच्या कटाक्षातून सुटू शकला नाही.

ब्रह्मपुराणातील प्रमाण दिले असल्याने त्याबद्दल निर्णय व्हायला हवा, असे सूचक वक्तव्य श्री. पाठक यांनी केल्याचे शांतारामशास्त्री यांच्या ध्यानात आले. शास्त्रार्थ सभेतील एकूण चर्चेच्या अनुषंगाने शांतारामशास्त्री यांच्या निदर्शनास एक बाब आली, ती म्हणजे, ब्रह्मपुराणातील प्रमाण ऐकल्यावर स्वामी काहीसे दुःखी झाले आणि ते वाल्मीकी रामायणामधील उल्लेखाशिवाय इतर काहीही बोलायला तयार नव्हते. प्रत्यक्षात वाल्मीकी रामायणामध्ये युद्धाच्या संबंधाने किष्किंधाचा उल्लेख आहे. दोन श्‍लोक जन्मविषयक असून, गुहा असा शब्द जन्मासाठी वापरण्यात आला आहे. तरीही किष्किंधामध्ये हनुमान जन्मस्थळ असल्याचे वाल्मीकी रामायणमध्ये नमूद नाही.

नाशिकमधील दुतोंड्या मारुतीचा किष्किंधा पंचवटी तीर्थ उल्लेख

ब्रह्मपुराणामध्ये नाशिकमधील गोदावरी नदीतील रामकुंडाशेजारी दुतोंड्या मारुतीचा किष्किंधा पंचवटी तीर्थ असा उल्लेख आहे. त्याबद्दल सांगताना शांतारामशास्त्री म्हणाले, की प्रभू रामचंद्र किष्किंधाला गेले. तेथे हनुमान, सुग्रीव, अंगद आदींची भेट झाली. रावणाविरुद्धचे युद्ध जिंकल्यावर प्रभू रामचंद्र हनुमान यांच्यासह सहा जणांसोबत अयोध्येला राज्याभिषेकासाठी निघाले. प्रवासात त्यांचा मुक्काम नाशिकमधील दंडकारण्यात झाला. हा परिसर प्रभू रामचंद्र यांना आवडला आणि चार दिवस मुक्कामी थांबले. त्या वेळी प्रभू रामचंद्र यांनी सोमेश्‍वर, रत्नेश्‍वर, सदाशिवेश्‍वर अशा पाच शिवलिंगांची स्थापना करून घेतली. किष्किंधावासीयांचा विजय प्रतीक म्हणून किष्किंधा पंचवटी तीर्थ म्हणजे, दुतोंड्या मारुतीचे स्थान असा उल्लेख ब्रह्मपुराणात आहे. शिवाय ब्रह्मपुराणाच्या सोबत संत वाङ्‍मयात अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ असा उल्लेख आहे.

अमित शहांकडून अंजनेरी विकास मदत अपेक्षाविषयक आख्यायिका

अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ असा उल्लेख पुराणांसह संत वाङ्‍मय आणि सरकारी कागदपत्रांमध्ये आहे. तसे अंजनेरी पर्वतावरील जैन तीर्थक्षेत्रांचा उल्लेख कागदपत्रांमधून आढळतो. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडून अंजनेरीच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा असल्याचा भाव त्र्यंबकेश्‍वरवासीयांच्या मनात आहे. शास्त्रार्थ सभेतील गोंधळावेळी त्र्यंबकेश्‍वरच्या तीर्थ पुरोहितांकडून या आख्यायिकेचा जाहीर उल्लेख केला गेला. एवढेच नव्हे, तर केंद्राकडून किष्किंधा विकासासाठी मदत मिळावी यासाठी स्वामींची धडपड सुरू असल्याचे सांगायला हे पुरोहित विसरलेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT