govindanand & gangadhar pathak esakal
नाशिक

नाशिक : ब्रह्म पुराणानुसार अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ

महेंद्र महाजन

नाशिक : ब्रह्मपुराणातील वेद व्यासांच्या (ved vyas) वचनांनुसार हनुमान जन्मस्थळ (Hanuman Birthplace) अंजनेरी (जि. नाशिक) हे असल्याचा निर्वाळा अयोध्येमधील रामजन्मभूमीचे (Ayodhya Ramjanmabhumi) प्रमुख आचार्य गंगाधर पाठक यांनी बुधवारी (ता. १) दिली. नाशिकमधील वेदशास्त्रसंपन्न शांतारामशास्त्री भानोसे यांनी मंगळवार (ता. ३१)च्या शास्त्रार्थ सभेत ब्रह्मपुराणातील अंजनेरीविषयक ८४ व्या अध्यायातील हनुमान जन्मविषयक बारावा श्‍लोक म्हणून दाखविला होता. शांतारामशास्त्रींच्या या दाव्याला अनुमती देत असताना श्री. पाठक यांनी कर्नाटकमधील किष्किंधा (Kishkindha) भक्तगणांनी अंजनेरीमध्ये येऊन हनुमान जन्मभूमीचे आणि अंजनामातेचे दर्शन घ्यावे, असे स्पष्ट करत वादावर पडदा टाकला. (Hanuman Birthplace Controversy Nashik News)

श्री. पाठक यांनी शांतारामशास्त्री यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत बुधवारी सकाळी ब्रह्मपुराणातील उल्लेखाविषयक चर्चा आवर्जून केली. शास्त्रार्थ सभेत रंगलेल्या ‘हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा’प्रमाणेच दावे-प्रतिदावे हमरीतुमरीवर आल्याने ही सभा गुंडाळली गेली होती. त्यानंतर बुधवारी नाशिक रोडच्या महर्षी पंचायतन सिद्धपीठममध्ये स्वामी आणि श्री. पाठक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी हनुमान जन्मस्थळविषयक अर्धवट राहिलेली चर्चा पुढे जाण्यासाठी हा कार्यक्रम होत असल्याचे स्पष्ट केले होते. तेव्हा हनुमान जन्मस्थळ एक आणि हनुमानांची जन्मतिथी एक यावरील स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी आग्रह सोडावा, अशी विनंती श्री. पाठक यांनी केली होती.

बुधवारी सायंकाळी स्वामी रथ घेऊन सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी रवाना झाले.

तसेच आपला देश विविधतेने नटलेला असल्याने दक्षिण भारतामध्ये चैत्र पौर्णिमेला, तर उत्तर भारतात कार्तिक महिन्यात हनुमान जन्मोत्सव साजरा होत असल्याचा दाखला दिला. श्री. पाठक म्हणाले, की ब्रह्मपुराणातील उल्लेखानुसार कल्पगणना पद्धतीच्या आधारे बालकल्पनुसार अंजनेरी येथे हनुमान जन्मस्थळ आहे. वर्तमानकल्पनुसार कर्नाटकमधील किष्किंधामध्ये हनुमान जन्मस्थळ असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हनुमान भक्तांनी किष्किंधामध्ये हनुमान जन्मस्थळी दर्शनासाठी जायला हवे. मुळातच, भाविकांची श्रद्धा, भावना यांना ठेच लागण्याचे कारण नाही. श्रद्धेच्या ठिकाणाच्या परिसरातील अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने तसे व्हायला नको.

पत्रकार परिषद

अंजनामातेची अंजनेरीमध्ये तपश्‍चर्या
अंजनेरी येथे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी भेट दिली असताना त्यांनी स्थानिक महंत अशोकबाबा यांच्याशी चर्चा करताना अंजनेरी हे हनुमान माता अंजना यांच्या तपश्‍चर्येचे स्थान असू शकते, असे सांगितले होते. तेव्हा अशोकाबाबा यांनी अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे ठासून सांगितले होते. पण तरीही स्वामींचा किष्किंधा हे हनुमान जन्मस्थळ असल्याचा दावा कायम राहिला. हा वाद राजकीय वळणे घेत पुढे गेला. शास्त्रार्थ सभेत राजकीय वादंगाने कळस गाठला. पत्रकार परिषदेत पुन्हा अंजनेरीत जाऊन तपश्‍चर्या स्थळाच्या केलेल्या उल्लेखाचा पुनरुच्चार करून स्वामी म्हणाले, की वाल्मीकी रामायणामध्ये हनुमान जन्मासाठी वापरण्यात आलेल्या गुहेचा व्याकरण पुस्तकाच्या आधारे किष्किंधा नावाच्या गुहेचा अर्थ निघतो.

तसेच तिरुपतीमधील हनुमान जन्मस्थळ वादावेळी ब्रह्मपुराणातील अंजनेरीच्या जन्मस्थळाबद्दल आपण खंडन केलेले आहे. शृंगेरीचे जगद्‍गुरू शंकराचार्य यांच्याशी २० दिवस चर्चा झाली आहे. द्वारकाधीश जगद्‍गुरू शंकराचार्य यांनी किष्किंधा हे हनुमान जन्मस्थळ आहे यास मान्यता दिली आहे. ब्रह्मपुराणात हनुमानाचे वडील कोण, आई कोण, जन्म कुठे झाला, हनुमान जन्मतिथी काय आहे याचा सविस्तर उल्लेख नाही. त्यामुळे अंजनेरी हे जन्मस्थळ आहे हे बोलता येत नाही.

स्वामी गोविंदानंद सरस्वती म्हणाले...
० शास्त्रार्थ सभेसाठी उपस्थित विद्वानांपैकी दोघांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही संस्कृत येत नव्हते.
० रावणाचा पराभव करून प्रभू रामचंद्र अयोध्येला निघाले असताना ते नाशिकला थांबले असतील, तर त्र्यंबकेश्‍वरचे दर्शन करून गेलेत का?
० केंद्र सरकार हनुमान जन्मस्थळविषयक प्रमाणाच्या वादामध्ये पडू इच्छित नाही.

किष्किंधा हनुमान रथ गुजरातकडे रवाना
त्र्यंबकेश्‍वरहून स्वामी गोविंदानंद सरस्वती हे किष्किंधाचा हनुमान रथ घेऊन नाशिक रोडच्या महर्षी पंचायतन सिद्धपीठममध्ये दाखल झाले होते. इथे दोन दिवसांपासून रथ उभा होता. नाशिक रोड भागातील रथाची मिरवणूक स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी (ता. १) नाशिकमधील १५ मंदिरांमध्ये रथ घेऊन आम्ही दर्शनाला जाणार आहोत, असेही स्वामींनी शास्त्रार्थ सभेच्या पूर्वसंध्येला सांगितले होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. अखेर बुधवारी सायंकाळी स्वामी रथ घेऊन सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी रवाना झाले. सापुतारामध्ये मुक्काम करून ते गुजरातकडे रवाना होणार आहेत. रवाना होण्यापूर्वी त्यांनी सिद्धपीठमच्या जनावरांना खाद्य दिले.

"ब्रह्मपुराणाच्या आधारे विद्वानांनी ऋषीमुख पर्वत, पंपा, किष्किंधा हे नाशिक जिल्ह्यात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ मान्य करत असताना इतर बाबी मान्य करायला हव्यात. लौकिकार्थाने नव्याने उभारण्यात आलेली वृंदावने देशात आहेत. मात्र शास्त्रीय आधारांचा अनादर करून चालणार नाही."
- गंगाधर पाठक, प्रमुख आचार्य, अयोध्या रामजन्मभूमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT