Domestic Violence esakal
नाशिक

Nashik Crime: 15 लाखांसाठी विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : सासरच्या मंडळींनी १५ लाखांची मागणी करत विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ तसेच, आयटी कंपनी असल्याचे फसवून विवाहास प्रवृत्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्यात पती, सासू- सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विवाहितेचा ९ मार्च २०२२ ला धार्मिक पद्धतीने थाटामाटात विवाह झाला होता. (Harassment of married woman for 15 lakhs Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुलाची स्वतःची आयटी कंपनी असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात कंपनी बंद असून पतीचे विवाहापूर्वी प्रेमसंबंध आणि विवाहानंतर संबंध असल्याचे उघड झाले. विवाहास ७ ते ८ दिवस उलटत नाही तोच सासू- सासरे आणि पतीने नवीन व्यवसायासाठी पंधरा लाखांची मागणी केली.

विवाहात अधिक खर्च झाल्याने विवाहितेने रक्कम आणण्यास नकार दिला. त्यानंतर सासऱ्यांनी मुलीच्या वडीलास फोन करून १५ लाखांची मागणी केली. त्यासाठी वारंवार मारहाण आणि शिवीगाळ करत शारीरिक, मानसिक छळ केला.

विवाहितेच्या तक्रारीवरून पती अमेय जगदीश परदेशी (३३), सासरे जगदीश धोंडीलाल परदेशी (६४), सासू सरला जगदीश परदेशी (६०), नणंद प्रतिका प्रतीक भौमिक (३५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

Sakal Podcast: कमी वजनाच्या बाळासाठी उभारणार एसएनसीयू कक्ष ते कसोटीतील विजयानंतर भारतीय कर्णधाराकडून विराटची स्तुती

कुमक कमी, तरी पोलिसांचे ‘मिशन इलेक्शन’ यशस्वी! सोलापूर शहराच्या तिन्ही विधानसभेची निवडणूक शांततेत; ८२८ बूथचे ४५ सेक्टर करून पोलिस आयुक्तांकडून बंदोबस्ताचे चोख नियोजन

Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई, चार बांगलादेशी नागरिकांना अटक

5 वर्षांनंतर सोलापूरला मिळणार स्थानिक पालकमंत्री? सोलापूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांची प्रदेशकडे मंत्रिपदाची मागणी; दोन्ही देशमुख की कल्याणशेट्टींना संधी, उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT