Transfer  esakal
नाशिक

Police Transfer : पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; दोघांवर कामकाजात कसुरीचा ठपका!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील २० पोलिस ठाण्यांच्या प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या असून, ओझर आणि इगतपुरी पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांवर कामकाजात गंभीर कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांची आडगाव येथील पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

तसेच, नियंत्रण कक्षातील दोघांना इगतपुरी, ओझर पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. (Hasty transfers of police officers Blame on both of them in work nashik news)

जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी बुधवारी (ता. ८) मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील २० पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या तडकाफडकी अधीक्षक कार्यालयांतर्गत बदल्या केल्या. बहुतांश पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी, या अनुषंगाने ग्रामीण पोलिस दलात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

इगतपुरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत पथवे आणि ओझरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक रहाटे या दोघांवर कामकाजात गंभीर कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांची आडगावला नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे,

तर नियंत्रण कक्षातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांची ओझरला व राजू सुर्वे यांची इगतपुरी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी बजावले आहेत.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

या अधिकाऱ्यांचा समावेश

ओझर विमानतळ सुरक्षेची जबाबदारी असलेले अशोक पवार यांची पिंपळगाव बसवंतला, नियंत्रण कक्षातील बिपीन शेवाळे- त्र्यंबकेश्‍वर, बापू महाजन- निफाड, राजेंद्र कुटे- सिन्नर, श्याम निकम- सिन्नर एमआयडीसी, पांडुरंग पवार- येवला तालुका, नंदकुमार कदम- येवला शहर, पंढरीनाथ ढोकणे- छावणी (मालेगाव), जयराम छापरिया- किल्ला (मालेगाव), शिवाजी बुधवंत- मालेगाव शहर, दौलत जाधव- आझादनगर (मालेगाव), तर सहायक निरीक्षक गणेश म्हस्के यांची हरसूल पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारीपदी नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

रमजानपुरा पोलिस ठाण्याचे बाळासाहेब थोरात- मनमाड, कैलास वाघ- चांदवड, यशवंत बाविस्कर- रमजानपुरा, समीर बारावकर- देवळा, दिंडोरीचे चेतन लोखंडे- वावी, सुरगाण्याचे सहायक निरीक्षक नीलेश बोडके- वणी, देवळ्याचे सहायक निरीक्षक पुरुषोतम शिरसाठ- जायखेडा, तर आयेशानगरचे सहायक निरीक्षक मनोज पवार यांची वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली आहे.

यांची पदस्थापनाच नाही

पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे, अनिल भवारी, दिगंबर भदाणे, सहायक निरीक्षक प्रल्हाद गिते, सागर कोते यांच्याही बदल्या झाल्या आहेत. परंतु, त्यांची पदस्थापना करण्यात आलेली आहे. तर नियंत्रण कक्षातील श्री. शेवाळे, रमजानपुराचे श्री. थोरात, नियंत्रण कक्षातील पांडुरंग पवार, अधीक्षक कार्यालयातील श्री. वाघ,

दोषसिद्धी शाखेचे श्री. बाविस्कर, चांदवडचे समीर बारावकर यांच्यासह नियंत्रण कक्षातील सहायक निरीक्षक श्री. म्हस्के, दिंडोरीचे श्री. लोखंडे, सुरगाण्याचे श्री. बोडके, देवळ्याचे श्री. शिरसाठ व आयेशानगरचे मनोज पवार यांना शिवजयंती बंदोबस्तानंतर बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश अधीक्षक उमाप यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT