death esakal
नाशिक

Nashik News : सायखेडाच्या नदीपात्रालगत आढळला मुंडके नसलेला मृतदेह; जिल्ह्यात खळबळ

सागर आहेर

चांदोरी (जि. नाशिक) : सायखेडा शिवारात गंगानगर देवीमंदिर जवळ गोदावरी नदीपात्रात मुंडके नसलेले प्रेत आढळून आल्याने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली असून घातपात करून पुरावा नष्ट करण्यासाठी सदर प्रेत नदी पात्रता टाकले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला,

असून अशपाक इब्राहिम शेख वय ५३ धंदा. व्यापार व ग्रामपंचात सदस्य राहणारा सायखेडा यांच्या फिर्यादीवरून सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंडके नसलेले प्रेत असल्याने सदर गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. (Headless dead body found near river bed of Saikheda Nashik News)

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायखेडा शिवारात गंगानगर देवीमंदिर जवळ गोदावरी नदीपात्रात कोणीतरी अज्ञात आरोपीत याने अज्ञात अनोळखी मयतास अज्ञात कारणावरुन ठार मारुन त्याचे शिर (मुंडके ) धडावेगळे करुन मयताची ओळख पटू नये म्हणुन पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने शिर (मुंडके) कोठेतरी विल्हेवाट करुन सदर धड हे गोणपटात (बारदान) टाकुन दोन्ही गोणपट (बारदान) हे तारेने बांधुन त्यास गोदावरी नदीपात्रात टाकुन दिल्याने,

ते वाहत येवुन सायखेडा शिवारात गंगानगर देवीमंदिर जवळ गोदावरी नदीपात्रात मिळुन आले म्हणुन सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मयताचे वर्णन वय अंदाजे २८ ते ३० वय अंगात तपकिरी काळे, पिवळसर चेक्सचा LEE कंपनीचा XL साईजचा हाफ बाहिचा शर्ट व निळया रंगाची KAP-10 कंपनीची जिन्स पॅन्ट व निळया रंगाची अंडरपेंन्ट.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

उजवे हाताचे मनगटात पिवळया रंगाचा रबर बॅन्ड त्यावर काळा व सफेद रंगाची गोलाकार डिझाईन असलेली घातलेला दिसत असुन उजव्या हाताचे मनगटावर अंगठ्याजवळ तीन स्टार गोंदलेले.

त्या शेजारी "ॐ" गोंदलेले व त्या शेजारीच "माँ "गोंदलेले. उजवे हाताच्या कांबीवर" हितेश" नाव गोंदलेले. उजवे दंडावर माँ: नाव गोंदलेले आहे.अधिक तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक पी वाय कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

SCROLL FOR NEXT