Vaishnvi Nimba Pawar_Nashik News 
नाशिक

Nashik News: हृदयद्रावक! नाशिकमध्ये गरम तेलाच्या कढईत पडल्यानं चिमुकलीचा मृत्यू

Amit Ujagare (अमित उजागरे)

नाशिक : गरम तेलाच्या कढईत पडल्यानं सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर इथं ही दुर्घटना घडली. साम टिव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. सटाणा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (Heartbreaking incident in Nashik six years old girl dies after falling into hot oil pan)

सूत्रांच्या माहितीनुसार, वैष्णवी निंबा पवार (वय ६) असं या चिमुकलीचं नाव आहे. निंबा पवार हे खाद्यपदार्थांची गाडी चालवतात. कढईतील तेलामध्ये पदार्थ बनवल्यानंतर त्यांनी ती कढई गाडीतून उतरवून खाली ठेवली होती. त्याचवेळी वैष्णवी बाजूलाच खेळत होती. दुसऱ्या कामात व्यस्त असल्यानं आपल्या चिमुकलीकडं त्याचं लक्ष गेलं नाही आणि तिचा तोल जाऊन ती गरम असलेल्या तेलाच्या कढईत पडली आणि गंभीररित्या भाजली.

हे ही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

मुलगी कढईत पडल्याचं लक्षात येताच त्यांनी तिला बाहेर काढलं आणि स्थानिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी नेलं. पण गंभीररित्या भाजल्यानं तिला अधिकच्या उपचारांसाठी नाशिक शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद पाडू म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीचे जोरदार आंदोलन

IT Act Amendment: मुंबई हायकोर्टाचा केंद्र सरकारला दणका! IT कायद्यातील घटनादुरुस्ती रद्द करण्याचे आदेश; युट्यूब, फेसबुक, ट्विटरला दिलासा

Latest Marathi News Live Updates: नानासाहेब परुळेकरांच्या जयंतीनिमित्त नितीन गडकरींचं भाषण

SCROLL FOR NEXT