Heatstroke Room : राज्यासह नाशिक जिल्ह्यातही तापमान ४० अंशांच्या पुढे जाऊन उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यातच राज्यात उष्माघाताने बळींची संख्या वाढत आहे.
अशा पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग सतर्क झाला असून, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिले आहेत. (Heatstroke room in every health center in district Prepared by ZP Health Department nashik news)
जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात एक कक्ष स्थापन होणार आहे. या वातानुलुकीत कक्षामध्ये पाणी, प्राथमिक कीट, थंडावा निर्माण करणारी फळे यांचा समावेश असणार आहे. दरम्यान, या आदेशआन्वये ओझर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी (ता. १८) उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली.
केंद्र सरकारनेही याबाबत आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात प्रत्येक तालुक्याने, प्राथमिक आरोग्य केंद्राने या मार्गदर्शक सुचनांनुसार आपला उष्णता कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
तसेच, उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्युचे डेथ ऑडीट जिल्हास्तरीय डेथ ऑडिट कमिटीमार्फत नियमितपणे करण्यात यावे. कोणत्याही मृत्युचे डेथ ऑडीट एक आठवड्याच्या आत करावे. सार्वजनिक ठिकाणी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात याव्यात.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
यात बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, धार्मिक ठिकाणे, बँका, पेट्रोल पंप, मुख्य रस्ते आदी सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. उन्हात लोकाना विश्रांतीसाठी थंड सावलीच्या जागा निर्माण करणे.
धार्मिक ठिकाणे, धर्मशाळा दिवसभर खुल्या ठेवणे. बाग, टेरेसना उष्णता विरोधी रंग लावणे, कार्यालये, शाळा, महाविद्यालयांच्या कामाच्या वेळा बदलणे आदी सूचनांचा समावेश आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून प्रत्येक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.