Police checking two-wheelers and four-wheelers in the city on Sunday night. esakal
नाशिक

Nashik New Year Party: नाशिकमध्ये रात्रभर पोलिसांचा चोख बंदोबस्त; मद्यपी चालकांवर कारवाई

अतिमद्यसेवन केलेल्या वाहनचालकांना थेट रुग्णालयात दाखल करून त्यांची वैद्यकीय तपासणी केली गेल्याने अनेकांची नशाच उतरली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मावळत्या वर्षाला निरोप अन्‌ नववर्षाचे स्वागत रविवारी (ता. ३१) मध्यरात्रीला शहरात जल्लोषात आणि दणक्यात करण्यात आले. रविवारी शहरासह जिल्ह्यात पार्ट्यांची रंगत वाढली.

सरत्या वर्षाला निरोप देताना मद्यसेवनासह नियम मोडणाऱ्यांचा पोलिसांनी चांगलाच बंदोबस्त केला. जागोजागी नाकाबंदी केल्याने तळीराम पोलिसांच्या सापळ्यात अडकले. रात्री उशिरा सुरू झालेली ही तपासणी पहाटेपर्यंत कायम होती.

अतिमद्यसेवन केलेल्या वाहनचालकांना थेट रुग्णालयात दाखल करून त्यांची वैद्यकीय तपासणी केली गेल्याने अनेकांची नशाच उतरली. (Heavy police presence throughout night Action against drunk drivers on new years eve nashik)

शहरासह ग्रामीण भागात तरुणाईची गर्दी लक्षवेधक ठरली. नाशिक परिक्षेत्रात दोन दिवस आधीपासूनच ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात होता. रविवारी (ता. ३१) पहाटेपर्यंत साडेचार हजार वाहनांची तपासणी करण्यात आली.

त्यापैकी ९५ मद्यधुंदावस्थेतील वाहनचालकांवर कारवाई केली गेली. शनिवारी सायंकाळपासून वाइन शॉपवर गर्दी झाल्याने काही ठिकाणी पोलिसांनी विशेष गस्त घातली.

बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षकांसह बिट मार्शल, स्थानिक गुन्हे आणि ११२ डायल या पथकांची गस्त सुरू होती. मद्यपी आणि रात्री गोंधळ घालणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या पथकांनी अटकाव केला. रात्री आठपासून शहरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली.

प्रत्येक चारचाकी आणि संशयित दुचाकीस्वारांची तपासणी करण्यात आली. अतिप्रमाणात मद्यप्राशन केल्याचा संशय आलेल्या व्यक्तींना थेट जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून ‘ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह’च्या कारवाई करण्याचे निर्देश होते.

आयुक्तांकडून भेटी

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रात्री आयुक्तालय हद्दीतील नाकाबंदीच्या पॉइंटवर प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. या मोहिमेत पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

जिल्ह्यात ४० पार्ट्यांना परवानगी

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहर-जिल्ह्यात रिसॉर्ट, फार्महाइस, हॉटेल्स, परमीट बिअर बार यासाठी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. या पार्ट्यांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहर-जिल्ह्यातील ४० पार्ट्यांना परवानगी देण्यात आल्याची माहिती एक्साईजचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी दिली.

...असा होता बंदोबस्त

शहर पोलिस : पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त- सहा, पोलिस निरीक्षक- ३५, सहाय्यक व उपनिरीक्षक- १००, पोलिस कर्मचारी- २०००. स्थानिक पोलिस स्टेशन, वाहतूक शाखा, गुन्हे शाखेची पथके.

ग्रामीण पोलिस : अपर अधीक्षक- दोन, उपअधीक्षक- आठ, निरीक्षकांसह दोन हजार कर्मचारी-अधिकारी

- सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी

- हॉटेल्स, बार, रिसॉर्ट, फार्महाउसची तपासणी

- ‘ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह’च्या तपासणीसाठी संशयित थेट रुग्णालयात

- रात्री नऊनंतरच्या पार्ट्यांवर पोलिसांची नजर

"नववर्षाचा आनंद उत्साहात साजरा करा. परंतु त्यासाठी नियमांचे पालन अवश्य करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास, मद्यपान करून वाहन चालविल्यास गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल."- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT