Heavy rain reference marathi rain update news esakal
नाशिक

Rain Update : आदिवासी भागासह गंगापूर धरण पाणलोटात मुसळधार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि त्र्यंबकेश्‍वर या आदिवासी भागासह वरुणराजाने गंगापूर धरणाच्या (Gangapur dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार (heavy rain) हजेरी लावली. पाऊस आज अधूनमधून विश्रांती घेत पुन्हा संततधार हजेरी लावत राहिला.

गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आठ हजार ८८० वरून सायंकाळी सात हजार १२८ क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आला. होळकर पुलाखालून दहा हजार ८५४ क्यूसेक पाणी वाहत होते. त्याचवेळी गोदावरीच्या पुराची पातळी कमी होऊन रामकुंडाशेजारील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत सायंकाळपर्यंत कमी झाली होती. (Heavy rain in Gangapur Dam catchment area including tribal areas Nashik Rain Update News)

डोंगराच्या भूस्सखलनाच्या भीतीमुळे बोंडारपाड्यावरील (ता. पेठ) १५ कुटुंबे घोटीविहीर गावात स्थलांतरित करण्यात आली आहे. याशिवाय नाशिक-देवळा रस्त्यावरील भाबडबारीत कोसळलेली दरड हलवत वाहतूक खुली करण्यात आली.

गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांपर्यंत जिल्ह्यात १६६.५ टक्के पाऊस झाला आहे. २४ तासांत सुरगाण्यात १४४.६, दिंडोरीत ८९.२, पेठमध्ये २०७.५, त्र्यंबकेश्‍वरमध्ये १०२.२ मिलिमीटर पाऊस झाला. मालेगाव तालुक्यात ६.४, बागलाणमध्ये २५.१, कळवणमध्ये ६४.८, नांदगावमध्ये १४.२, नाशिकमध्ये ४४.६, इगतपुरीमध्ये ७४.९, निफाडमध्ये २२.२, सिन्नरमध्ये २०.१, येवल्यात १३, चांदवडमध्ये २३.९, देवळ्यात ३७.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी (ता.१४) सायंकाळी सहापर्यंत कश्‍यपी धरणाच्या पाणलोटमध्ये १५, गौतमी गोदावरीच्या पाणलोटात ९०, गंगापूर पाणलोटात २५, त्र्यंबकेश्‍वरमध्ये ५१, अंबोलीत ६२, दारणाच्या पाणलोटात १९, भावलीच्या पाणलोटात १२० मिलिमीटर पाऊस झाला.

दरम्यान, धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग क्यूसेकमध्ये असा : दारणा- दहा हजार ६७०, कडवा- दोन हजार ५९२, आळंदी- ६८७, नांदूरमध्यमेश्‍वर- ५३ हजार ८१५, पालखेड- २५ हजार १८२, करंजवण- १४ हजार ८९१, वाघाड- तीन हजार ५०३, पुणेगाव- ६५३, चणकापूर- सात हजार ४९६, हरणबारी- तीन हजार ६८९, केळझर- एक हजार ३६४.

गुजरातचा टाळावा प्रवास

नाशिक-गुजरात सीमावर्ती भागात दरड कोसळल्याने ठप्प असलेल्या वाहतुकीनंतर आता गुजरातमधील वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये जाऊ इच्छिणाऱ्यांनी प्रवास टाळावा, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

गुजरातमध्ये पावसाचा जोर आहे. गुजरातमधील राष्ट्रीय महामार्ग आठवर वाहतूक संथपणे सुरू आहे. त्यामुळे गुजरातला जाणे टाळावे, असे पालघर जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

पाणवेली मोकळ्या

शहर-जिल्ह्यातील दारणासह गोदावरी आणि तिच्या उपनद्यांत वर्षभर वाढणाऱ्या पाणवेलीं गोदावरी काठच्या गावांना विळखा पडतो. दोन्ही प्रमुख नद्यांतील पाणवेली नांदूरमध्यमेश्वरच्या फुगवटाक्षेत्रातील चांदोरी-सायखेडा भागासाठी त्रासदायक ठरतात.

पाणवेलीच्या विळख्याने बंधाऱ्यासह अनेक पुलांना धोका निर्माण झाल्याने त्या काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडून दोन दिवस-रात्री जेसीबी लावून पाणवेली काढण्याचे काम सुरू होते. त्यामुळे बऱ्यापैकी पाणवेली वाहून जाण्यात मदत झाली.

पावसाच्या पडसादाच्या नोंदी

० नांदूरमध्यमेश्वरमधून १६, दारणामधून ३.५९, गंगापूरमधून २.२५, कडवामधून १.०६, आळंदीमधून ०.१० टीएमसी पाण्याचा विसर्ग

० औद्योगिक वसाहतींमधील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी ४८ तासांची प्रतीक्षा

० अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एक हजार २४१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

० महिरावाणीमध्ये भरलेल्या पाझर तलावाचे पूजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT