Sanket Yeole esakal
नाशिक

ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या मालेगावच्या तरुणास मदत

- प्रशांत कोतकर

नाशिक : समाजप्रगतीच्या वाटचालीत साथीदार बनू या... कोणीही शिक्षण-आरोग्यसुविधेपासून वंचित राहणार नाही, याची प्रतिज्ञा करू या... असं समाज मंडळाच्या बैठकीत किंवा वार्षिक कार्यक्रमात बोललं जातं. मात्र, अशा काही घटना, वेळ, प्रसंग असतो ज्यात जो प्रतिसाद मिळतो त्याला तोड नसते. मोठे मन दाखविणाऱ्या सहृदयी थोर माणसे हीच समाजाच्या प्रगतीची बलस्थाने आहेत.

समाजकल्याणासाठी मदतीच्या रूपाने समाजात चैतन्य निर्माण करून त्यांच्या मदतीमुळे समाजातील एक गुणवंत युवक गतिमान होऊन समाजप्रगतीचा माईलस्टोन ठरेल, अशी सकारात्मक घटना नुकतीच नाशिक जिल्ह्यात घडली. समाजबांधवांच्या आर्थिक मदतीने परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा मार्ग सुकर झाला आहे. (Help to youth of Malegaon who went to Australia for higher education Nashik Latest Marathi News)

मालेगाव येथील हुशार व कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेला संकेत. अतिशय गरीब दांपत्य असलेले राजेंद्र हरी येवले व एका पायाने अधू असलेल्या रेखा येवले यांचा हा पुत्र. ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी गेलेला. दीड वर्षे लागणाऱ्या उपजीविकेसाठी सुमारे तीन लाख रुपये मदतीची गरज. अत्यंत प्रतिकूल व हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करीत संकेतला घडविणाऱ्या पालकांपुढे पैसे मुलाला देण्याचा यक्ष प्रश्‍न उभा राहिला.

समाजपुत्र संकेतच्या मदतीसाठी पुणेस्थित प्राध्यापक दीपक येवले यांनी समाजबांधवांना आवाहन करीत सुमारे तीन हजार जणांना वैयक्तिक मेसेज पाठविले. सत्यतेची जाणीव करून दिली अन्‌ प्रतिसादाने समस्त समाजजागृतीचे दर्शन घडले. २१ ऑगस्टला सुरू झालेला समाज दातृत्वाचा प्रवाह ओसंडून वाहू लागला. अवघ्या दोन दिवसांत तीन लाख रुपये संकेतच्या बॅंक खात्यात जमा झाले. तिसऱ्या दिवशी अधिकच्या ५० हजारांची भर पडली. शंभर रुपये ते एक लाख रुपयापर्यंत मदतीसाठी अक्षरश: रीघ लागली.

मुंबई येथील सतीश बाबूलाल दशपुते या दातृत्वरुपी दानशूर समाजश्रीने उत्स्फूर्तपणे एक लाख रुपयांची मदत करीत सकारात्मक निरपेक्ष कार्याला ऊर्जा दिली. प्रतिसादरुपी प्रेमात मनोज शिरोडकर (पुणे), श्रीकृष्ण कोतकर (बेंगळुरू) या दानवीरांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या भरीव मदतीमुळे उद्दिष्ट निम्म्यावर आले.

पुणे येथील चार्जिंग स्टेशन कंपनी, इव्ही कनेक्ट इंडिया, डॉ. भोकरेज वात्सल्य हॉस्पिटल, योगेश दशपुते, उदय मुसळे, मिलिंद रमेश वाणी, चंद्रकांत अमृतकर, देवीदास येवलेकर (मुंबई), नाशिक येथील प्रदीप कोठावदे, किशोर धामणे व शिरीन बागड यांचे योगदानातून उद्दिष्ट दृष्टिक्षेपात आले.

पुणे येथील विजय बधान, सचिन वाणी, मनीष चिंचोरे, राहुल वाणी, संजय कोतकर, सुधाकर येवलेकर, वैभव खानकरी, श्रीकृष्ण मालपुरे, उल्हास देव, सोमनाथ पाचपुते, बालाजी ग्रुप, नाशिक येथील बागड प्रापर्टीजचे दीपक बागड, तर मुंबई येथील सुधीर येवले यांच्या योगदानातून उद्दिष्ट सफळ संपूर्ण झाले. उर्वरित ४७ दात्यांच्या उत्स्फूर्त योगदानामुळे संकेतचा मार्ग प्रशस्त होऊन भविष्य उज्ज्वल होण्यास बूस्टर डोस मिळाला.

संकेतचा जीवनप्रवास सुरळीत करण्यासाठीच्या प्रवासात प्रा. येवले यांच्या सकारात्मकतेला नाशिक येथील सुरेश धामणे, लाडशाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष गिरीश महाजन, भूषण महाजन, पुणे येथील प्रशांत पाटे, सीए अमोल भोकरे, कल्याण येथील प्रकाश बापू वाणी यांनी ऊर्जा दिली. वरील सर्व दातृत्ववानांसह समाजरत्न असलेल्या ७९ समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने सढळ हाताने जी मदत केली त्याबद्दल संकेतने भावनाविवश होऊन व्यक्त केलेली आंतरिक संवेदना बरेचकाही सांगून गेली.

सामाजिक सद्‍भाव आणि सहकार्य हा आपल्या समाजाचा स्वभाव आहे. समाजाचा विचार करणं म्हणजे फक्त ध्रुवीकरण आणि फुकटच्या अस्मिता सांभाळणं नसतं, तर समाज घटकांना खऱ्या अर्थाने पुढे नेणं असतं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कृष्ण-सुदामाची मैत्री. श्रीमद्‌ भगवद्‌गीतेमधील अध्याय तिसरा ‘कर्मयोग’मध्ये म्हटले आहे.

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण:।

शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ।।८।।

तू कर्तव्य कर्म कर. कारण, अकर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे. कर्म न करता राहण्याने शरीर निर्वाहही सिद्ध होणार नाही. नियत कर्माचा अर्थ कर्तव्य कर्म असा घेतला पाहिजे. त्यात परिवार, कार्यालय, समाज आणि राष्ट्राचे सदस्य म्हणून आपण केलीच पाहिजेत अशा कर्मांचा समावेश होतो. प्रा. दीपक येवले यांनी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हा सकारात्मक विचार पुढे नेत ‘जय समाज... जय संघटन... जय एकात्मता’चा संदेश देत समाजबांधवांना साद घालत कर्तव्य, कर्माची आठवण करून दिली अन्‌ संकेत येवलेचा उच्च शिक्षणाचा प्रवास सुकर केला.

"माझे रक्ताचे नातेवाईक तर हेच ७९ समाज महानुभाव आहेत. त्यांच्या ऋणात कायमच मी राहाणे पसंत करेल. २०२४ मध्ये मी सर्वांच्या पैशांची परतफेड तर करेलच, त्यासोबतच मला मिळालेल्या अधिकच्या पैशांचा विनियोग माझ्यासारख्या गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी करेन."

-संकेत येवले, ऑस्ट्रेलिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT