The traffic on the busy highway has also slowed down due to the hot summer esakal
नाशिक

Summer Temperature : उष्णतेच्या उच्चांकाने जनजीवन ठप्प! मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहतूकही मंदावली

विजय पगारे

Summer Temperature : तालुक्यात हंगामातील उष्णतेचा उच्चांक गाठल्यानंतर मागील आठवडाभरापासून तापमानाच्या शृंखलेत काहीसे चढउतार होत असले तरी टळटळीत उन्हामुळे जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे.

यास्थितीत शहरात व तालुक्यात सातत्याने अघोषित भारनियमनाचे चटके बसत आहे. यामुळे वाढत्या उकाड्याला तोंड देताना नागरिकांच्या नाकीनऊ आले आहे.

दरवर्षी सर्वसाधारणपणे मेच्या उत्तरार्धात ढगाळ वातवरण होऊन तापमान कमी होण्यास सुरवात होते, मात्र तशी चिन्हे अद्याप दिसत नाही. (high heat summer temperature rising Traffic on Mumbai Agra highway affected nashik news)

थंड हवेसाठी प्रसिद्ध इगतपुरीमध्ये मे महिन्यात उन्हाची दाहकता अधिकच वाढली आहे. एप्रिलमध्ये ४० अंशांच्या आसपास राहिलेल्या तापमानाने मे महिन्यात ४१ ते ४२ अंशापर्यंत पोचले आहे. पुढील काळात तो अधिक उंचावण्याची धास्ती मात्र कायम आहे.

मागील आठवडाभरापासून वर चढलेला पारा सतत वरच चढता राहिला आहे. त्यामुळे तीव्र उष्णता,उकाडा व अंगाची काहिली कायम राहिल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
सकाळच्या प्रहरातच आठ-नऊ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसायला सुरवात होते.

ती पार सूर्यास्तापर्यंत कायम राहते. यामुळे उन्हाच्या तडाख्याने बहुतांश नागरिक दुपारी घराबाहेर जाणे टाळत आहेत. या काळात प्रमुख बाजारपेठा, रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे दिसून येते. प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार थंडावलेले आहेत. शासकीय कार्यालयांतील वर्दळही कमी झालेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भारनियमनाचे चटके सुरू

शहरासह ग्रामीण भागात कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित होत असतो. सायंकाळी गर्दीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापारीवर्गात नाराजी आहे. विचारणा झाल्यास महावितरण स्थानिक बिघाडाचे कारण पुढे करते.

एखाद्या भागात अर्धा तास वीज गेली असल्यास ‘फ्यूज’ उडणे वा तत्सम बिघाड असू शकतो असे सांगितले जाते. शहरात वीजपुरवठा खंडित होण्यामागे तांत्रिक समस्या हेच मुख्य कारण असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

ग्रामीण भागात गळती-उत्पन्नाच्या निकषावर काही भागांत भारनियमन सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT