gas cylinder high price2.jpg 
नाशिक

यवढं महागडं 'सिलेंडर' मला नको गं बाय, माझी चुलचं लय झाक हाय...!

संजीव निकम : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (नांदगाव) गॅस - सिलिंडरच्या महागाईमुळे खेड्यांमधून पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. दुकानांमधून रॉकेल मिळत नसल्याने गृहिणी गोवऱ्या अन्‌  सरपणा कडे वळल्या आहेत. धुरापासून मुक्तीसाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली. शंभर रुपयात जोडणी मिळत असल्याने सुरवातीला योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. गॅस जोडणीनंतर मात्र, सिलिंडरची मागणी हळूहळू कमी होत गेली आणि चुली धूर ओकू लागल्या. 

तालुकानिहाय बारा हजार लिटरपर्यंत मिळणारे रॉकेल आता मिळेनासे

अनुदानित सिलिंडरच्या किमतीतील दरवाढ आवाक्‍याबाहेर गेल्याने आपली चूल बरी, अशी भावना आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांमधील गृहिणींमध्ये तयार झाली. चुलीसाठी सरपण मिळणे अवघड असले, तरी जंगल भागातून लाकूडफाटा आणण्यापेक्षा रस्त्याच्या कडेच्या काटेरी बाभळी विनापैशांच्या असल्याने ग्रामीण कष्टकरी महिला फांद्या-काड्या जमा करतांना दिसतात. रेशन दुकानातून रॉकेल मिळेनासे झाले आहे. जिल्ह्याला गेल्या वर्षापासून तालुकानिहाय बारा हजार लिटरपर्यंत मिळणारे रॉकेल आता मिळेनासे झाले आहे. त्यामुळे पशुधनांच्या गोवऱ्या चुलीसाठी वापरल्या जाऊ लागल्या आहेत. सात ते आठ रुपये किलोचे सरपण विकत घेण्याकडे कल वाढला आहे. 

 मातीच्या चुलींची वाढली मागणी 

नांदगाव तालुक्‍यातील पिंप्राळे, न्यायडोंगरी, चाळीसगाव तालुक्‍यांतील हिरापूर भागात मोठ्या प्रमाणात मातीच्या चुली बनवल्या जातात. या मातीच्या चुलींना सध्या बाजारात चांगली मागणी आहे. ऐंशी ते शंभर रुपयांपर्यंत आठवडे बाजारात चुली विकल्या जात आहेत. घरात उज्ज्वला गॅसचे कनेक्‍शन असले, तरी सिलिंडर परवडत नसल्याने चुलींची मागणी वाढल्याचे पिंप्राळे येथील सोनवणे बंधूंनी सांगितले. साकोरा गावातील आशाबाई व सुदाम सोनवणे हे कुटुंब मातीच्या चुली तयार करतात. त्यांच्या चुलींना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. न्यायडोंगरीच्या गवळीवाड्यात घरटी चुली पेटतात. वाड्यात शेणापासून गोवऱ्या मिळत असल्याने इंधनावरचा खर्च वाचतो. या भागात काही ठिकाणी गॅसची जोडणी आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत तालुक्‍यात गेल्या वर्षभरात साडेतीन हजार जोडण्या झाल्या असल्या, तरी त्यातील बहुतांश लाभार्थींनी सुरवातीला काही दिवस सिलिंडर घेतले. अन्य कुटुंबात गॅसचे भाव परवडत नसल्याने एक वेळेचा अथवा दिवसाआड स्वयंपाक हा चुलीवर केला जातो. 

उज्ज्वला योजनेत पाच किलोच्या गॅस- सिलिंडरची मागणी आहे. साधारणपणे पाच किलो सिलिंडरला तीनशे ते साडेतीनशे रुपये द्यावे लागतात. त्याच्या अनुदानाच्या पोटी मिळणारी रक्कम वजाजाता ते शंभर रुपयापर्यंत मिळू शकते. मात्र इंधन कंपन्यांची उदासीनता त्याला कारणीभूत ठरते. - लताबाई देवरे (गृहिणी) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News: विनोद तावडेंना अडचणीत आणणाऱ्या हितेंद्र ठाकूरांचा उमेदवार भाजपने पळवला, मतदानाच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणील ब्रेक; सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Updates : डहाणूत बहुजन विकास आघाडीला धक्का; बविआच्या उमेदवाराचा भाजप प्रवेश

आर्या-निक्कीमध्ये पुन्हा राडा ! निक्कीने आर्याला 'मोठा हाथी' म्हणत केली टीका तर आर्या म्हणाली...

Vinod Tawde : 'आप्पा ठाकूर आणि क्षितिज मला ओळखतात पण...' विनोद तावडेंनी CCTV फुटेजची मागणी, विवांता हॉटेलमध्ये काय घडलं ?

SCROLL FOR NEXT