एकमेकाशी भांडायचं की एकमेकांच्या साहाय्याने प्रगती करायची हे सामान्यांना आता चांगलंच कळायला लागलं आहे. एकमेकांचा हातात हात घेतल्याने प्रगतीच होणार हे सर्वांच्या लक्षात येवू लागले आहे. आणि याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला असून याच उत्तम उदाहरण नाशिकमध्ये पाहायला मिळालं.
हनुमान जयंती निमीत्त शहरात मिरवणूक निघाली होती.हनुमान जयंती निमीत्त मिरवणूक दूध बाजारात येणार असल्याने मुस्लिम बांधव भेटण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी पुष्पहार, फुले घेऊन सज्ज होते. मिरवणूक दूध बाजारात येताच हाजी युनूस, इमरान तांबोळी, जाफर शेख आदी मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.या मिरवणुकीमध्ये बेझे (त्र्यंबकेश्वर) येथील श्रीराम शक्तिपीठाचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज सहभागी झाले होते. महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराजांना खाली उतरण्याचे पाचारण केले, ते खाली येताच वरून गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालण्यात आला अन् सर्वत्र ''हम सब एक है''चा नारा घुमला.एकमेकांचा हात हातात घेऊन मुस्लिम बांधवांनी हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या, तर हिंदू बांधवांनी रमजानच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीतील भगवा ध्वज हातात घेऊन नाचवला, फिरवला. सगळीकडे आनंदी वातावरण होते. यावेळी पोलिस यंत्रणा मात्र तणावाखाली होती. मिरवणूक दूध बाजारातून पुढे सरकली, तेव्हा पोलिसांचा तणाव कमी झाला. या घटनेतून हम सब एक है, मानवधर्म ही हमारा धर्म है संदेश नाशिककरांनी जगासमोर ठेवला.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.