मालेगाव : तालुक्यासह कसमादेत झालेल्या अल्प पावसामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण होवू लागला आहे. चारा बाजारात चाऱ्याचे भाव दुप्पटीने वाढले आहेत.
हिरव्या कडब्याचे भाव दीड पटीने तर उसाच्या बांडीचे भाव दुप्पटीने वाढले आहेत. पाळीव जनावरांना चारा, पाणी उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. (Hirwa Kadaba increased by one half double price of Bandi Ranchers in trouble Nashik Agriculture News)
कसमादेत या वर्षी पावसाळ्यात जेमतेम सरासरीच्या ५० ते ६० टक्के एवढाच पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच सर्वात कमी पाऊस मालेगाव तालुक्यात झाला आहे. शासनाने मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर केला आहे.
जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न आतापासूनच निर्माण होवू लागला आहे. खरीप हंगामात मका व बाजरीचे पीक आले नाही.
शेतकऱ्यांनी काही प्रमाणात मका व बाजरीचा चारा साठवून ठेवला आहे. मात्र हा चारा पुरेसा नाही. ऐन उन्हाळ्यात पाण्याबरोबरच चारा टंचाईचा प्रश्नही निर्माण होणार आहे.
हिरव्या चाऱ्याची आवक घटली
येथील चारा बाजारात हिरव्या चाऱ्याची आवक कमी आहे. भाव वाढल्याने हिरव्या चाऱ्याला पुरेसे ग्राहक नाहीत. हिरवा कडबा (खोंड्या) पेंढीने विकला जात आहे. चार व पाच रुपयाप्रमाणे पेंढी मिळते.
एका पेंढीत सात ते आठ काड्या असतात. पूर्वी २० हजार रुपयात एकरभर कडबा मिळत होता. सध्या ३५ ते ४० हजार रुपये भाव आहे. हिरवा कडबा पाच हजार रुपये टनाने मिळत आहे. उसाची बांडी देखील महागली आहे.
बाजारात तीन व पाच रुपये दराने बांडीची पेंढी मिळत आहे. तीन रुपयात चार बांडी तर पाच रुपयात सहा बांडी असतात. बारीक बांडी तीन हजार तर जाड बांडी चार हजार रुपये टनाने मिळत आहे. सध्या चाळीसगाव, कन्नड आदी भागातून बांडी येथे विक्रीसाठी येत आहे.
"दुष्काळी परिस्थितीमुळे हिरवा कडबा (खोंडे) महाग मिळत आहेत. हिरवा चारा तालुक्यातील ग्रामीण भागातून आणावा लागतो. चाळीसगाव व कन्नड भागातून उसाची बांडी विक्रीसाठी येत आहे. खोंडे व बांडी पेंढ्या करून विकाव्या लागत आहेत. एरवीपेक्षा भाव जवळपास दुप्पटीने वाढले आहेत. उन्हाळ्यात भाव तर वाढतीलच परंतु हिरवा चारा मिळणे अवघड होणार आहे."
- रोहित चौधरी, चारा विक्रेता, मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.