जुने नाशिक : नगराध्यक्ष ते उपमुख्यमंत्री देणारी तसेच स्वातंत्र्यलढ्यात सहभाग असलेल्या रंगारवाडा शाळेला दोन वर्षांपासून टाळे लागले आहे. शाळेच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले राजकीय पदाधिकारीही त्यांच्या शाळेला वाचवू शकले नाही. अशीही ऐतिहासिक रंगारवाडा शाळा कालबाह्य झाली आहे. शाळेचे केवळ अवशेष उरले आहे. (Historical Rangarwada school which produces city mayor to deputy chief minister expired Nashik News)
बुधवार पेठेतील रंगारवाडा शाळेने केवळ नगराध्यक्ष ते उपमुख्यमंत्रीच दिले असे नाही, तर स्वातंत्र्य चळवळीत येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या गोपनीय बैठक झाल्या. अशी शाळा अनेक वर्षांपासून बंद पडली आहे. इमारतीचीही बिकट अवस्था झाली आहे. या ऐतिहासिक शाळेचे रुपडे पालटून सेमीइंग्रजी तसेच दहावीपर्यंत शाळा व्हावी, अशी येथील नागरिकांची इच्छा होती. ती पूर्ण झाली नाहीच. मात्र जे वर्ग सुरू होते, तेही बंद पडून शाळेला टाळे लागले.
खरंतर या शाळेत शिक्षण घेऊन नगरसेवक, नगराध्यक्ष, शिक्षण सभापती, महापौर, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री झालेल्यांनी शाळेचे काहीतरी देणेकरी लागतो, या अपेक्षेने तरी शाळेचा विकास करणे आवश्यक होते. ते मोठे झाले, परंतु जुने नाशिक आजही जुनेच राहिले असल्याची खंत ज्येष्ठांनी मांडली. केवळ मतदानाचा अधिकार आहे, म्हणून मतदान करावे लागते. नाहीतर मतदान करण्याची इच्छा राहिली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
शाळेची जागा घेतली आरोग्य उपकेंद्राने
महापालिका तसेच शाळेत शिक्षण घेणारे राजकीय पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने शाळेची प्रचंड दुरवस्था झाली आहे. विद्यार्थी संख्या कायमची घटली आहे. शाळेची दुरवस्था आणि विद्यार्थी नसल्याने शेवटी शाळा बंद पडली आहे. या बंद पडलेल्या शाळेचे सध्या आरोग्य उपकेंद्रात रूपांतर झाले आहे. शाळेच्या दोन खोल्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून आरोग्य उपकेंद्र सुरू केले आहे.
असे पडले शाळेस नाव
स्वातंत्र्यपूर्व काळात शाळेची निर्माण झाले होते. शाळेला लागूनच पूर्वी कपड्यांना रंग देण्याचे रंगारी काम या ठिकाणी होत. त्यावरून शाळेस रंगारवाडा शाळा, असे नाव पडले. दरम्यान, स्वातंत्र्य चळवळीत येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या गोपनीय बैठक झाल्या. चळवळीचे काय स्वरूप येथे ठरवले जात होते. त्यानुसार स्वातंत्र्य सैनिकांची पुढची रणनीती असायची, अशा पद्धतीने शाळेची वाटचाल होत. स्वातंत्र्यानंतर महापालिका रंगारवाडा शाळा ओळखली जाऊ लागली. शाळेतील विद्यार्थी संख्या घटत जाणे, शाळेची दुरवस्था, महापालिकेचे झालेले दुर्लक्ष अशा विविध प्रकारच्या समस्यांमुळे शाळा कालबाह्य झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
यांनी घेतले शिक्षण
- मधुकर कर्पे (माजी नगराध्यक्ष)
- उत्तमराव चव्हाण (माजी नगराध्यक्ष)
- रामकृष्ण मिरजकर (माजी नगराध्यक्ष)
- लक्ष्मण जानमाळी (माजी नगरसेवक)
- सुनील कमोद (माजी नगरसेवक)
- शाहू खैरे (माजी नगरसेवक)
- संजय चव्हाण (माजी शिक्षण समिती सभापती)
- शांतारामबापू वावरे (माजी महापौर आणि आमदार)
- वसंत गिते (माजी महापौर आणि आमदार)
- गणपतराव काठे (माजी आमदार)
- बबनराव घोलप (माजी मंत्री)
- छगन भुजबळ (माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.