holidays  esakal
नाशिक

Diwali Holiday: शासकीय कार्यालयांमध्ये सुट्यांमुळे शुकशुकाट; सलग सुट्यांमुळे जिल्हा परिषदेत शांतता

सकाळ वृत्तसेवा

Diwali Holiday: दिवाळीनिमित्त शुक्रवारपासून सुटी असलेली शासकीय कार्यालय सोमवारी (ता. १३) खुली झाली खरी. मात्र, सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सुटीचा माहोल दिसून आला. सर्वच कार्यालयांमध्ये कर्मचारी, अधिकारी यांची उपस्थिती अगदी नगण्य होती. बोटावर मोजण्याइतके कर्मचारी उपस्थित होते. (holiday atmosphere was seen in all government offices nashik news)

जिल्हा परिषदेत तर शुकशुकाट होता. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला १० ते १२ नोव्हेंबर, अशी सलग तीन दिवस आणि पुन्हा १४ व १५ नोव्हेंबर अशी दोन दिवस याप्रमाणे एकूण पाच दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. १०) धनत्रयोदशी, ११ नोव्हेंबरला दुसरा शनिवार असल्याने शासकीय सुटी होती. रविवार, १२ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन होते. सोमवारी शासकीय सुटी नसल्याने कार्यालये सुरू होती.

मात्र, बहुतांश कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी सुटी टाकलेली होती. सलग सुट्या असल्याने अनेकांनी सुटीचा अर्ज दिलेला असल्याचे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

अनेक विभागात हेच चित्र होते. कर्मचाऱ्यांसोबतच अनेक विभागप्रमुख देखील गैरहजर होते. बोटावर मोजणे इतके विभागप्रमुखांनी कार्यालयात हजेरी लावली.

उपस्थित असलेले कर्मचारी दुपारनंतर गायब झालेले दिसत होते. कर्मचारी, अधिकारी नसल्याने कामकाजात आनंदीआनंद दिसत होता. त्यामुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट पसलेला होता. जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिकेत असेच काहीसे चित्र होते. मंगळवारी (ता. १४) पाडवा, बुधवारी (ता. १५) भाऊबाजी या दोन सुट्या आलेल्या आहे.

याला जोडून गुरुवारी, शुक्रवारी अनेकांनी सुट्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालत हा आठवडा सुट्यांचेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम शासकीय कामकाजावर होणार, हे नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त; या तारखेला होणार सुनावणी

Latest Marathi News Updates : धारावीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर; तणावाची स्थिती

Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा

Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सुरजला जान्हवीने दिली टक्कर तर 'या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट्स; कोण होणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT