नाशिक : शहरातील अमलीपदार्थ विरोधात शहर पोलिस (Police) कठोर कारवाई सुरू आहे. हॉटेल शांती दत्त इनच्या सहाव्या मजल्यावरील कानिफ रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्टी रंगल्याची माहिती मिळताच,
अमलीपदार्थविरोधी पथकाने या रेस्टॉरंट वर धाड टाकून मॅनेजरसह ग्राहकांवर गुन्हा दाखल केला आहे. (Hookah Party at Kanif Restaurant Anti-narcotics squad raid nashik news)
रेस्टॉरंट मॅनेजर संशयित जावेद अली सत्तार अली (२२, रा. खैरे बिल्डिंग), राजुल इस्लाम जमरोद्दीन (२४) यांना पथकाने अटक केली आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील अवैध धंद्यासह अमलीपदार्थ विरोधात कारवाई करण्याचे आदेश देत स्वतंत्र पथक नियुक्त केलेले आहे.
अमलीपदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार गणेश वडजे यांना कानिफ रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्टी सुरू असल्याची खबर मिळाली होती. पथकाचे सहायक निरीक्षक हेमंत नागरे यांना या पार्टीची माहिती दिल्यानंतर त्याठिकाणी कारवाईचे आदेश दिले.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
त्यानुसार अंमलदार गणेश भामरे, रंजन बेंडाळे, भारत डंबाळे, नितीन भालेराव, बाळा नांद्रे, अनिरुद्ध येवले, भाऊसाहेब कुटे, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, महिला अंमलदार अर्चना भड यांच्या पथकाने रेस्टॉरंटवर धाड टाकली.
त्यावेळी आठ ग्राहक हुक्क्याचे सेवन करताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच, विक्री करणारे संशयित जावेद आणि राजुल यांनाही अटक करण्यात आली आहे. रेस्टॉरंटमधून पथकाने हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर, इतर साहित्य असा एकूण ६५ हजार २९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.