Corona News esakal
नाशिक

माणुसकीच नव्हे, संवेदनाही हरपल्या! बिलासाठी घेतल्या मृत महिलेच्या बांगड्या

विनोद बेदरकर

नाशिक : कोरोना महामारीच्या संकटकाळात माणुसकी तर हरवत आहेच; आता माणसांच्या संवेदनाही हरवत असल्याचा प्रत्यय विविध घटनांमधून सध्या येत आहे. काहीसे असेच दोन प्रकार शनिवारी (ता.१७) शहरात उघडकीस आले.

कोरोना रुग्णांची अनामत रक्कम घेतली जाऊ नये, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले असतानाही अनामत रक्कम व बिलापोटी शहरातील काही रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची अडवणूक केली जात आहे. अशाच एका प्रकारात वेळेत अनामत न भरलेल्या मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्या ठेवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. येथील देवळाली कॅम्प येथे एका रुग्णालय प्रशासनाने बिलापोटी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्याचा संतापजनक प्रकार समोर आला, तर दुसऱ्या घटनेत आनंदवली येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचे समोर आले आहे.

पोलिस आयुक्त चौकशी करतील..

याप्रकरणी सायंकाळी उशिरा मृत महिलेचे नातेवाईक देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात रुग्णालयाविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी थांबून होते. शकुंतला गोडसे (वय ६५, रा. लॅम रोड, देवळाली कॅम्प) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचा पुतण्या अनिल गोडसे यांनी रुग्णालय प्रशासनाच्या संवेदनाहिनतेची आपबिती ‘सकाळ’ला सांगितली. त्यानंतर हा प्रकार पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या लक्षात आणून दिला असता, त्यांनी पोलिस आयुक्त चौकशी करतील, असे सांगितले.

व्यवस्थित उपचार न झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप

संबंधित महिलेस १३ एप्रिलला कोरोना उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हाच अनामत व मेडिकल बिलाचे मिळून सुमारे एक लाख रुपयांची मागणी रुग्णालय प्रशासनाने केली. मात्र, संबंधित कुटुंबीय ३५ हजारच जमा करू शकले. त्यामुळे पुढील दिवसभर व्यवस्थित उपचार न झाल्याने १४ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. दरम्यान, अंत्यसंस्कारानंतर शनिवारी (ता. १७) कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन बांगड्यांबाबत विचारणा केली. त्या वेळी सुरवातीला स्थानिक कर्मचाऱ्यांनी अशा बांगड्याच नसल्याचे सांगितले. मात्र, त्यातून रुग्णालयात गोंधळ होऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केल्यानंतर दुपारी साडेचारला नातेवाइकांना बोलावून घेत, रुग्णालयाने बांगड्या सुरक्षित असल्याचे सांगितले. त्याचवेळी रुग्णालयाचे बिल म्हणून आणखी काही रकमेची मागणी करीत, त्यानंतर बांगड्या दिल्या जातील, असे सांगितल्‍याने संबंधितांनी सायंकाळी थेट देवळाली कॅम्प पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याचा आग्रह धरला. मात्र, पोलिसांनी तूर्तास केवळ तक्रार अर्ज घेतला असून, फिर्याद घेतली नसल्याचे मृतांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

आमच्या काकूंना उपचार देण्यात हलगर्जी केली गेली. बेडऐवजी एक दिवस स्ट्रेचरवर ठेवले. देवळाली कोविड सेंटरने वाईट वर्तन करीत त्यांना मारले. आमच्याप्रमाणे इतरांवर अशी वेळ येऊ नये, म्हणून झाल्या प्रकाराची चौकशी करून कोविड सेंटरची मान्यता काढून घ्यावी.

-अनिल गोडसे, लॅम रोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT