Nashik News : धोकादायक काझीगढीचा अद्याप प्रश्न सुटलेला नाही. यंदाही येथील रहिवाशांना भीतीच्या सावटात चार महिने तारेवरची कसरत करत जीवन जगावे लागणार आहे.
काझीगढीवासीयांच्या अनेक वर्षांची संरक्षण भिंतीची मागणी पूर्ण होत नसल्याने त्यांच्यावर पूरस्थितीत वेगळी परिस्थिती निर्माण होते. (Houses in dangerous condition on Kazi Gadi nashik news)
जिल्हा आणि महापालिका प्रशासन कुठल्यातरी दुर्घटनेची वाट पाहत आहे की काय, असे प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केले जात आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की काझीगढी येथील रहिवाशांमध्ये धडकी भरत असते. कधी कुठली दुर्घटना होईल सांगता येत नाही. सतत मुसळधार पाऊस असलेल्या दिवसांमध्ये तर बऱ्याचदा त्यांना जागून रात्र काढावी लागते. यापूर्वी गढीची माती कोसळल्याने येथील अनेक घरे कोसळण्याच्या घटना घडल्या आहे.
त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. अन्य ठिकाणी व्यवस्था असलेल्या काही रहिवाशांनी स्थलांतर केले आहे. ज्यांची व्यवस्था नाही. असे रहिवासी आजही जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहे. पावसाळा आला की त्यांना भीतीच्या सावटात पावसाळ्याच्या चार महिने तारेवरची कसरत करत जीवन जगावे लागत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यंदाही त्यांच्यावर तीच परिस्थिती आली आहे. जिल्हा आणि महापालिका प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी पावसाळ्यात त्यांना भीतीच्या सावटात दिवस काढावे लागत आहे. गढीस संरक्षण भिंत बांधल्यास रहिवाशांची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी आहे.
महापालिकेकडून केवळ सोपस्कार
महापालिकेकडून काझीगढीवासीयांना केवळ नोटीस बजावून स्थलांतरित होण्याच्या सूचना करण्याचा सोपस्कार केला जातो. यंदाही त्यांच्याकडून गढीवरील १०० धोकादायक घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहे. असे करून समस्या सुटणार नाही. त्यावर काहीतरी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.