memon family.jpg 
नाशिक

INSIDE STORY : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे झाले उध्वस्त? जाणून घ्या देशद्रोही कुटुंबाविषयी..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : १२ मार्च १९९३.. मुंबईतील तो काळा दिवस.. साखळी बॉम्बस्फोटाने हादरली होती. १२ ठिकाणी झालेल्या या स्फोटांमध्ये तब्बल २५७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७१३ जण जखमी होते. या बॉम्बस्फोटासाठी ३ हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले होते. विशेष म्हणजे त्यातील केवळ १० टक्केच आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. त्या बॉम्बस्फोटात जीवितहानीप्रमाणे २७ कोटींची वित्तहानीही झाली होती. जवळपास इतक्या निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या मेमन कुटुंबीयही उध्वस्तच झालयं.. कसं ते पाहा

माहिममधल्या इमारतीत रचला कट
१९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या बॉम्बस्फोटात सुमारे ८०० जणांना मृत्यू झाला होता. तर काही हजार नागरिक जखमी झाले होते. या भयावह बॉम्बस्फोटाचा सूत्रधार हा टायगर मेमन होता. मेमन हा माहीम येथे राहत होता. त्याच्या घरात शक्तीशाली बॉम्ब बनवण्यात आले होते. टायगर मेमनचे आईवडिल अब्दुल रझाक मेमन आणि हनिफा मेमन हे मुंबईतील माहीममधील एका आठ मजली अल-हसैनी नावाच्या इमारतीत राहत होते. याच इमारतीतच बॉम्बस्फोटांचे कट रचण्यात आले होते. मुश्ताक उर्फ ​​टायगर मेमन हा याकूबचा भाऊ असून मास्टरमाइंड दाऊद इब्राहिमचा उजवा हात होता. १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्ब स्फोटांच्या आदल्या दिवशी टायगर मेमनच्या माणसांनी आरडीएक्स (स्फोटक पदार्थ) त्याच अल-हुसैनी इमारतीत आणून ठेवले होते. या खटल्यात टायगर मेमन याचे संपूर्ण कुटुंब हे आरोपी होते. या खटल्यातील आरोपी टायगर मेमन, युसूफ मेमन, आयुब मेमन, याकूब मेमन, इसा मेमन असून यापैकी टायगर मेमन अजूनही फरार आहे. तर याकूबला फाशी देण्यात आली आहे. इसा, रुबिना, युसूफ हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. यापैकी युसूफचा आज नाशिक जेलमध्ये हृदय विकाराने मृत्यू झाला आहे 

मेमन कुटुंब आणि १९९३ मुंबई बॉम्बस्फोट 

वडिल अब्दुल रझाक मेमन - मृत्यू
साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेमन असून त्याचे वडिल अब्दुल रझाक मेमन व आई हनिफा मेमनही यामध्ये सामील होते. बॉम्बस्फोट हल्ल्यानंतर हे कुटुंब फरार झाले होते. त्यानंतर मेमन कुटुंबातील सदस्य भारतात परतल्यानंतर अब्दुल रझाक याला अटक करण्यात आली. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. तुरूंगात तो आजारी पडला आणि काही वर्षांनंतर त्याला जामीन मिळाला. वयाच्या ७३ व्या वर्षी २००१ मध्ये त्याचे निधन झाले.

आई हनिफा मेमन -  निर्दोष
पत्नी हनिफा मेमन याच्यावर मुलगा टायगर आणि त्याच्या मित्रांच्या दहशतवादी कृत्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही वर्ष तुरुंगात राहिल्यानंतरही तिला जामिनावर सोडण्यात आले. अखेरीस, पुरावा नसल्यामुळे टाडा कोर्टाने तिची सुटका केली. 

आयुब मेमन (मोठा भाऊ)- फरार
साखळी बॉम्बस्फोटाच्या खटल्यात टायगर मेमनचा भाऊ आयुब मेमन सध्या फरार आहे.

टायगर ( धाकटा भाऊ) फरार - मास्टरमाईंड प्लॅनमध्ये सामील 
मुश्ताक उर्फ ​​टायगर मेमन हा याकूबचा भाऊ असून मास्टरमाइंड दाऊद इब्राहिमचा उजवा हात होता.

युसुफ मेमन ( धाकटा भाऊ) -कारागृहात  मृत्यू
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिकच्या कारागृहात मृत्यू झाला. तो २०१८ पासून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. हृदय विकाराच्या झटक्याने युसूफ मेमनचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. युसूफ मेमन हा टायगर मेमनचा भाऊ होता. 

याकुब मेमन ( धाकटा भाऊ) - फाशी
बॉम्बस्फोटातील आणखी एक आरोपी याकुब मेमन हा चार्टर्ड अकाऊंटंट होता. माहिमच्या त्याच इमारतीत दुसर्‍या मजल्यावर त्याच्या नावावर फ्लॅट आहे. टायगरचे सर्व अकाऊंट याकूब हा सांभाळत असे. त्याला (३० जुलै २०१५ पहाटे ) फाशी देण्यात आली.  याकूबची पत्नी राहिन हीची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली. पुरावा नसल्यामुळे टाडा कोर्टाने तिची सुटका केली

इसा मेमन ( धाकटा भाऊ)  -जन्मठेप 
बॉम्बस्फोटातील आणखी एक आरोपी इसा मेमन याला या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सुलेमान मेमन ( धाकटा भाऊ) - निर्दोष
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या टायगरचा भाऊ सुलेमान मेमनची सुध्दा निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर त्याची पत्नी रुबिना हिला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याचे कारण स्फोटासाठी लागणारे आरडीएक्स ज्या गाडीतून आणले होते. ती गाडी तिच्या नावावर असल्याने यात तिला दोषी ठरविण्यात आले आहे.

कुटुंबाविषयी हे माहित आहे का?

टायगरचे वडील अब्दुल रझाक मेमन हे क्रिकेटप्रेमी

टायगरचे वडील अब्दुल रझाक मेमन हे उत्साही क्रिकेटपटू आणि स्वत: मुंबई लीगमधील खेळाडू होते. त्यांचा मुलगा मुश्ताक उर्फ टायगर हा मोठा झाल्यावर त्याला मोठा क्रिकेटपटू करण्याची उत्सुकता होती. १९९३ च्या बॉंम्बस्फोटनंतर परदेशात राहत असलेल्या मेमन कुटुंबातील सदस्य भारतात परतल्यानंतर अब्दुल रझाक याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. तुरूंगात तो आजारी पडला आणि काही वर्षांनंतर त्याला जामीन मिळाला. वयाच्या ७३ व्या वर्षी २००१ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची पत्नी हनिफा मेमन याच्यावर मुलगा टायगर आणि त्याच्या मित्रांच्या दहशतवादी कृत्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही वर्ष तुरुंगात राहिल्यानंतरही तिला जामिनावर सोडण्यात आले. अखेरीस, पुरावा नसल्यामुळे टाडा कोर्टाने तिची सुटका केली. 

टायगर मोस्ट वॉंटेड गुन्हेगार..

याकूबचा भाऊ मुश्ताक मेमन उर्फ ​​टायगर याच्यावर तस्करीचा आरोप होता आणि त्याने दाऊद इब्राहिमच्या अवैध धंद्यातील प्रतिनिधीत्व केले होते. स्फोटांच्या एक दिवस आधी तो दुबईमध्ये पळून गेला होता आणि तेथूनच तो पाकिस्तानात गेला. जेथे तो दाऊदसह लपला असल्याची माहिती मिळाली.  टायगर हा भारताचा मोस्ट वॉंटेड गुन्हेगार होता.असे म्हणतात की, बाबरी मशिदीच्या विध्वंसचा बदला घेण्यासाठी टायगरने दाऊदसोबत बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड प्लॅन केला होता. टाडा कोर्टात त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपानुसार त्याने या प्रकरणात सामील असलेल्या आरोपींना शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तान जाण्यासाठी तिकीटही दिले. त्यानंतर १९९४ मध्ये टायगरला अटक करण्यात आली होती. तसेच टाडा कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2006 मध्ये त्याला टाडा कोर्टाने टायगरला दोषी ठरवले  आणि २७ जुलै २००७ रोजी कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. 21 मार्च 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा या स्फोटाचा मास्टरमाईंड​

१२ मार्च १९९३ बॉम्बस्फोटासाठी ३ हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले होते. त्यातील केवळ १० टक्केच आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. त्या बॉम्बस्फोटात जीवितहानीप्रमाणे २७ कोटींची वित्तहानीही झाली होती. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा या स्फोटाचा मास्टरमाईंड आहे. तर आरोपींमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कय्यूम यांचा समावेश होता.

दाऊदच्या मृत्यूबाबत आशंकाच
मुंबईतील सन १९९२च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या याआधी अनेकदा आल्या आहेत. त्यातच मागील आठवड्याच त्याला आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी पसरली. अनेक आजार असलेल्या दाऊदचा कोरोनामुळेच कराचीमधील एका रुग्णालयात  निधन झाल्याचे वृत्त देण्यात आले. काही वृत्तवाहिन्यांनी ही बातमी सूत्रांचा हवाला देत वारंवार प्रसारित केली. मात्र, दाऊदचे व्यवहार सांभाळणारा त्याचा भाऊ अनिस याने हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले.

टाडा न्यायालयाने ठरविले दोषी 
साखळी बॉम्बस्फोटात एकूण १२९ आरोपी आहेत. त्यांतील 100 आरोपींना आरोपांनुसार टाडा न्यायालयाने दोषी ठरवून ६ महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत. 7 सप्टेंबर 2017 रोजी विशेष टाडा कोर्टाने कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह त्याच्या साथीदारांना शिक्षा सुनावली. अबू सालेम आणि करिमुल्लाला जन्मठेप, ताहीर मर्चंट आणि फिरोज खान यांना फाशीची शिक्षा सुनावली. तर रियाज सिद्दीकीला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT