Swasthyam 2023 esakal
नाशिक

Diabetes Control : आहार, विहाराच्या योग्‍य मार्गदर्शनातून मिळवा नियंत्रण; मधुमेह परिसंवादात तज्‍ज्ञांचा सूर

सकाळ वृत्तसेवा

Diabetes Control : जीवनशैलीतील बदलांसह इतर अनेक कारणांनी मधुमेहींच्‍या संख्येत वाढ होत आहे. मधुमेह टाळण्यासाठी किंवा मधुमेहाचे निदान झाल्‍यास आजार नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना महत्त्वाच्‍या ठरतात.

नियंत्रित आहार, व्‍यायाम यासोबतच योग्‍य मार्गदर्शनातून उपचार घेताना मधुमेह नियंत्रणात ठेवत सुखी, समाधानी व आनंदी जीवन जगता येऊ शकते, असा सूर शनिवारी (ता. १९) आयोजित परिसंवादात उमटला. (how to control diabetes naturally nashik news)

‘सकाळ-स्‍वास्‍थ्‍यम संघा’तर्फे गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित परिसंवादात सहभागी होताना तज्‍ज्ञांनी उपस्‍थितांना मार्गदर्शन केले. नाशिककरांचा या कार्यक्रमाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.

परिसंवादात उत्तर महाराष्ट्राचे निष्णात हृदयरोगतज्‍ज्ञ डॉ. मनोज चोपडा, मधुमेहतज्‍ज्ञ डॉ. प्रवीण कल्‍याणकर, ऊर्जा उपचारतज्‍ज्ञ अमृता चांदोरकर, आहारतज्‍ज्ञ शिल्‍पा जोशी, मधुमेहतज्‍ज्ञ डॉ. अर्चना सारडा, ओबेसी व मधुमेहतज्‍ज्ञ डॉ. नीता देशपांडे सहभागी झाले होते. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ‘निरामय जीवनसूत्र’ दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्‍या सुरवातीस ‘सकाळ’चे नवीन उपक्रम विभागाचे प्रमुख हेमंत वंदेकर, उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे मुख्य व्‍यवस्‍थापक (जाहिरात) पंकज पिसोळकर, उपवृत्तसंपादक प्रशांत कोतकर, वरिष्ठ व्यवस्थापक किरण शिंदे यांनी वक्‍त्‍यांचे स्‍वागत केले.

प्रास्‍ताविकात श्री. वंदेकर म्‍हणाले, की प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे आरोग्‍य चांगले राहिले तर सामाजिक आरोग्‍यदेखील चांगले होण्यास मदत होईल, या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन केले आहे. यापूर्वी पुण्यात झालेल्‍या कार्यक्रमात जागतिक स्‍तरावरील तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्‍ध करून दिले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या उपक्रमांचा महाराष्ट्रस्‍तरावर विस्‍तार करताना नाशिकमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले. त्‍यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमातून उपस्‍थितांना नक्‍कीच उपयुक्‍त माहिती मिळेल, असा विश्‍वास वाटतो.

परिसंवादात सहभागी तज्‍ज्ञांनी मनोगतातून विविध प्रश्‍नांची उत्तरे देताना उपस्‍थितांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे ऊर्जा पार्टनर निरामय वेलनेस सेंटर, हेल्‍थ पार्टनर शारंगधर फार्मास्युटिकल व सहपार्टनर चोपडा मेडिकेअर ॲन्ड रिसर्च सेंटर प्रा. लि. व मॅग्‍नम हार्ट इन्‍स्‍टिट्यूट होते. लोकज्‍योती ज्‍येष्ठ नागरिक मंचाचे सहकार्य लाभले. प्रोग्राम मॅनेजर शुभम जगताप यांनी सूत्रसंचालन केले. उपवृत्तसंपदक प्रशांत कोतकर यांनी आभार मानले.

योगमुद्रा कार्यशाळेतून निरोगी जीवनाचा जपला मंत्र

परिसंवादानंतर योगमुद्रा कार्यशाळा घेण्यात आली. अमृता चांदोरकर यांनी विविध मुद्रांचे प्रात्‍येक्षिक दाखविताना त्‍याचे फायदे विशद केले. शारीरिक व मानसिक स्‍वास्‍थ्‍याशी निगडित विविध आरोग्‍यविषयक तक्रारी व त्‍यावरील मुद्रांची माहिती त्‍यांनी दिली. यामध्ये नमस्‍कारमुद्रा, ध्यानमुद्रा, जलमुद्रा, प्राणमुद्रा, समानमुद्रा आदींचे प्रात्‍येक्षिक त्‍यांनी दाखविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT