नाशिक : घरची परिस्थिती हालाखीची असल्याने कष्टकरी आई- वडिलांना आर्थिक (Fianancial) मदत करत घराचा गाडा हाकताना दिवसा काम आणि रात्री अभ्यास करत शहरातील साई, समीर, मेरी, विशाल आणि शुभम या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत (HSC Exam Success) यश मिळविले आहे. (HSC Result Success story Nashik News)
साई सुरेश धुमाळ हा शहरातील जोशी वाडा परिसरात राहतो. त्याची आई घरगुती कामे करते, तर त्याचे वडील रिक्षा चालवीत आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे, अशी त्यांची इच्छा असल्याने साईने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर वाणिज्य शाखेत के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर दिवसा काम आणि रात्री अभ्यास करत त्याने बारावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. आता घराचा आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी तो पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत आहे.
साईप्रमाणेच त्याचे मित्र समीर आवारे, मेरी बोधक, विशाल बरडे, शुभम मोरे यांचीदेखील घरची परिस्थिती गरीब. मात्र, त्यांनीदेखील साईप्रमाणेच पार्ट टाइम जॉब करून मिळेल त्या वेळेत अभ्यास करत यशस्वी कामगिरी केली आहे. हे सर्व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. कष्टातून मिळालेला पैसा आणि शिक्षणाचे महत्त्व सर्वांना पटले आहे. चांगले शिक्षण घेतले तरच चांगली नोकरी मिळेल. यासाठी कामासोबत शिक्षण घेण्याचे त्यांचे ध्येय आहे.
जल्लोषासाठी मिळेना वेळ...
साई धुमाळ यांची परिस्थिती गरीब असल्याने घरातील सर्वजण कामे करतात. बुधवारी (ता. ८) बारावीचा निकाल लागल्यानंतर साईला आपण पास झाल्याचे समजताच खूप आनंद झाला. मात्र, हा आनंद त्याला कामामुळे कुटुंबीयांसह साजरादेखील करता आला नाही. कारण त्याची आई सायंकाळी काम उरकून घरी येणार, मात्र तो काम संपवून रात्री उशिराने घरी जाणार. यामुळे इतर कुटुंबीयांप्रमाणे निकाल लागताच साजरा केला जाणारा जल्लोष किंवा पेढा भरवून कौतुक करणारी आई हे क्षण त्यांना तत्काळ अनुभवता आले नाही. साई किंवा त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या यशाचा जल्लोष करण्यासाठी रात्रीची वाट पहावी लागली.
"आई, वडील, भाऊ असे आम्ही सगळे छोटी मोठी कामे करत कुटुंबासाठी हातभार लावतो. मोठा भाऊ देखील काम करत शिक्षण घेत आहे. त्याचा आदर्श घेत मी काम करत शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलत ध्येय गाठण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे." - साई धुमाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.