Ashwini Sonwane, Yogesh Wagh, Diksha Kamble, Payal Kate Aarti Kakad esakal
नाशिक

HSC Success Story: शेतीकामाचे ओझे पेलूनही पायल, आरती टॉपर! शिकण्याची उमेद

सकाळ वृत्तसेवा

HSC Success Story : जिद्द, शिकण्याची उमेद आणि अभ्यासाची तळमळ असली की यश नक्की मिळते..हे या ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनींनी दाखवून दिले. वर्षभर कॉलेज करून रोज शेतीकामात आई-वडिलांना मदतीचा हात देतानाच कधी पायी तर कधी सायकलवर शाळेत येत विद्यार्थिनींनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. विद्यालयात विद्यार्थिनी टॉपर आल्या आहेत.

सकाळी कॉलेज, दुपारी शेतीकामात आई-वडिलांना मदत आणि सायंकाळी पुन्हा स्वयंपाक घराची जबाबदारी...या कामांचे ओझे वर्षभर पेलूनही शेतकऱ्याच्या लेकींनी मिळवलेले यश कौतुकाचे ठरत आहे. (HSC Success Story Payal Aarti topper despite carrying burden of farm work Desire to learn nashik news)

सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम. जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९२ टक्के लागला. अतिशय प्रतिकूलतेवर मात करत कुटुंबाचे अपेक्षांचे ओझे पेलवत अभ्यासाची जबाबदारीही निभावत पायल काटे व आरती काकड या दोघींनी ८०.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.

प्रतिकूलतेवर मात करत मिळविलेल्या तिच्या उत्तुंग यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वर्षभर नांदूर येथून कधी सायकलवर तर कधी पायी शाळेत येऊन शिक्षणाची आवड जपणारी अश्विनी सोनवणे ७७.३३ टक्के मिळवून द्वितीय तर योगेश वाघ याने ७७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

धामोडा येथील अतिशय गरीब कुटुंबातील दीक्षा कांबळे हिने ७६.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोद पाटील, सहसचिव प्रवीण पाटील, संभाजी पवार यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विद्यार्थ्यांना प्राचार्य शरद ढोमसे, पर्यवेक्षक आर. जी. पैठणकर, ज्येष्ठ शिक्षक गजानन नागरे, वाय. ए. दराडे, पोपट भाटे, वसंत विंचू, उमाकांत आहेर, संतोष विंचू, नामदेव पवार, योगेश भालेराव, कैलास मोरे,

योगेश पवार, रवींद्र दाभाडे, संजय बहिरम, भाग्यश्री सोनवणे, प्रमोद दाणे, उज्ज्वला आहेर, लक्ष्मण माळी, रोहिणी भोरकडे, सगुना काळे, सविता पवार, अर्चना शिंदे, विकास व्यापारे, हृषीकेश काटे, मयुरेश पैठणकर, रोहित गरुड, नीलेश व्हनमाने, सागर मुंढे, मच्छिंद्र बोडके, लक्ष्मण सांगळे आदींनी अभिनंदन केले.

"विद्यार्थ्यांची हलाखीची परिस्थिती असली तरी अशा स्थितीतही ज्ञानदानाचे पवित्र कार्य शिक्षकांनी जपले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी होतकरू असल्याने त्यांची तयारी करून घेतली जाते. गुणवंत विद्यार्थ्यांमुळे विद्यालयाचा नावलौकिकात भर पडली आहे."

-प्रमोद पाटील, जनरल सेक्रेटरी, शिक्षण प्रसारक मंडळ, नगरसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT