ozar airport esakal
नाशिक

हैदराबाद विमानसेवा 22 जुलै तर दिल्ली 4 ऑगस्टपासून : खा. गोडसे

विनोद बेदरकर

नाशिक : कोरोनामुळे (Corona) वर्षभरापासून बंद असलेली नाशिक- हैदराबाद विमानसेवा (Airline service) २२ जुलै तर नाशिक -दिल्ली विमानसेवा ४ ऑगस्टपासून पुन्हा सुरळीतपणे सुरू होणार आहे. आजपासून (ता.६) ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रणाली सुरू झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे (hemant godse) यांनी दिली. (Hyderabad Airlines from July 22 and Delhi from August 4 MP Hemant Godse Nashik News)

स्पाइस जेट कंपनीकडून पुरवली जाणारी ही नाशिक -हैदराबाद आठवड्यातून सहा दिवस तर नाशिक -दिल्ली विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार आहे. नाशिक -हैदराबाद आणि नाशिक -दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होणार असल्याने नागरिकांत समाधान आहे. केंद्र शासनाच्या उडान २ योजनेंतर्गत नाशिक शहर देशभरातील महत्त्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडले जावे, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी पाच वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले होते. नागरी वाहतूक प्रशासनाकडे गोडसे यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. विमानसेवेसाठी खासदार गोडसे यांनी दिल्लीत जाऊन नागरी हवाई मंत्रालयासमोर आंदोलनही केले. सततच्या पाठपुराव्यातून तीन वर्षांपूर्वी नाशिक येथील ओझर विमानतळावरून प्रत्यक्ष विमानसेवेस प्रारंभ झाला.

मात्र २ वर्षापूर्वी कोरोना प्रार्दुभावामुळे विमानसेवा बंद करण्यात आली होती. नाशिक- हैदराबाद, नाशिक- दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होण्यासाठी खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिक -हैदराबाद विमानसेवा २२ जुलै पासून तर नाशिक -दिल्ली विमानसेवा ४ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती स्पाइस जेट प्रशासनाने खासदार गोडसे यांना कळविले आहे. नाशिक -हैदराबाद विमानसेवा शनिवार वगळता रोज तर नाशिक- दिल्ली विमानसेवा रोजच उपलब्ध असणार आहे.

हैदराबाद - नाशिक हे विमान हैदराबाद येथून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी निघणार असून तेच विमान पुन्हा सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी ओझर येथून हैदराबादसाठी उड्डाण घेईल. दिल्ली -नाशिक हे विमान सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी रोज दिल्ली येथून नाशिकसाठी उड्डाण घेणार असून तेच विमान नाशिकहून पुन्हा दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी दिल्लीसाठी उड्डाण घेईल. नाशिक- हैदराबाद या विमानात प्रवाशांची क्षमता ८० असणार असून हा प्रवास अवघ्या ९० मिनिटांचा राहील. नाशिक -दिल्ली विमानात १८९ प्रवाशांची आसन क्षमता असणार असून प्रवास दोन तासांचा असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT