Nashik News : लाखो भाविकांच्या श्रद्धा व प्रेमाचे प्रतीक असलेल्या संत श्री जनार्दन स्वामी महाराजांची जप वह्यांपासून तयार करण्यात आलेली मूर्ती सध्या भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनली आहे. ओझर येथील आश्रमात विधिवतपणे मूर्तीची पूजा करून स्थापित करण्यात आली.
साक्षात बाबाजी आपल्याशी बोलत आहेत, असा भाविकांना मूर्ती पाहिल्यावर भास होत आहे. (Idol of Janardhan Swami Maharaj made from chanting books nashik news)
जनार्दन स्वामी महाराज व त्यांचे उत्तराधिकारी श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज लाखो भक्त महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या नावाचा अखंड जपनाम भक्तगणांकडून सुरू असतो. त्यातून प्रेम, शांतता, निश्चितता या गोष्टी प्राप्त होतात. बाबांचा जप ‘ओम जनार्दनाय नमः’ असा मंत्र लिहून केला जातो. विशेष म्हणजे लाखो भाविक अशा पद्धतीने जप करतात.
बाबांबद्दल मनात असलेले प्रेम पेनच्या माध्यमातून वहीवर उतरते. ‘ओम जनार्दनाय नमः’ अशा स्फूर्तिदायक जपाने वह्या भरल्या जातात. अशा प्रकारचे जप करण्याचे आवाहन शांतिगिरी महाराज यांनी भक्तांना केले. परंतु, वही जपाने भरल्यावर त्या जपवह्यांचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर पर्याय म्हणून स्वामी शांतिगिरी महाराज यांनी त्या जपवह्यांच्या कागदापासून जनार्दन स्वामींची मूर्ती बनविण्याचा निश्चय केला.
या कामाची जबाबदारी त्यांनी रामानंद महाराज व नाशिकचे बांधकाम व्यावसायिक अनिल आहेर यांना दिली. त्या दोघांनी मिळून मूर्तिकार वरुण भोईर यांच्या मदतीने या मूर्तीची निर्मिती एका तरुण मूर्तिकाराकडून नाशिक शहरात करून घेतली. या कामासाठी नाशिकमधील इंटेरियर डिझायनर रवी फडोळ यांनी मार्गदर्शन केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
लाखो वह्यांमधील कागदांवर ‘ओम जनार्दनाय नमः’ हा जप साकारला आहे. या जपमय कागदांचा स्फूर्तिदायक संच जनार्दन स्वामी महाराजांच्या मूर्ती स्वरूपात अवतरला. अशा पद्धतीचा मूर्तिकामाचा प्रयोग हा प्रथमच करण्यात आलेला आहे.
प्रत्यक्षात मूर्ती साकारल्यावर नागपंचमीच्या दिवशी आश्रमात जनार्दन स्वामी महाराजांची मूर्ती विधिवत पूजा करून स्थापित करण्यात आली. महामंडलेश्वर १००८ शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मूर्तीची स्थापना करण्यात आली. बाबाजी स्वतः आपल्याशी संवाद साधत असल्याचे गौरवोद्गार शांतिगिरी महाराज यांनी यावेळी काढले.
"जपवह्यांपासून मूर्ती बनविण्याच्या कामाची जबाबदारी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी माझ्यावर सोपविली, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. या माध्यमातून माझ्या हातूनही गुरुसेवा घडली. याचे सर्व श्रेय श्री श्री १००८ शांतिगिरी महाराज यांना जाते. मी त्यांचा आभारी आहे." - अनिल आहेर, परफेक्ट बिल्डकॉन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.