Nashik Igatpuri Rev Party case Sakal
नाशिक

हिना पांचाळसह 25 संशयितांना 5 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

अरुण मलानी

नाशिक/इगतपुरी शहर : इगतपुरी परीसरातील स्काय ताज व्हीला या खासगी बंगल्‍यात रेव्ह पार्टी प्रकरणी (Nashik Igatpuri Rev Party case) बंगला मालकावर गुन्‍हा दाखल करत पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे. पार्टीत सहभागी बिग बॉस फेम हिना पांचाळसह अन्‍य पंचवीस संशयितांना मंगळवारी (ता.29) न्‍यायालयासमोर हजर करतांना आवश्‍यक पुरावे सादर केले. त्‍यामुळे न्‍यायालयाने पंचवीस संशयितांना 5 जुलैपर्यंत पुन्हा पोलिस कोठडी सुनावली. त्‍यामुळे आता पोलिस तपासात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्‍यता आहे. (25 suspects including Hina Panchal remanded in police custody till July 5)


रेव्‍ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी ताब्‍यात घेतलेल्‍या 29 संशयितांपैकी चार संशयितांना यापूर्वीच न्‍यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित पंचवीस संशयितांना काल (ता.28) एक दिवसाची कोठडी सुनावली होती. या सर्व संशयितांना मंगळवारी (ता.29) न्‍यायालयासमोर हजर करण्यात आले. सबळ पुरावे सादर करतांना पुढील चौकशीसाठी कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली. त्‍यानुसार ५ जुलैपर्यंत या सर्व पंचवीस संशयितांना पोलिस कोठडीत पाठविले आहे.

बिग बॉस फेम हिना पांचाळ हिच्‍यासह श्रृती शेट्टी, चांदणी भटीजा, ऋची नार्वेकर, ज्योती नाईक, करीश्मा शेट्टी, प्रिती चौधरी, शयाना लांबा, अशिता शर्मा, सिना गबलानी, विभा गोंडोलीया, अमित लाट, आशिष लाट, राजेश त्रिवेदी, विशाल मेहता, अबु बकर शेख, रोहित अरोरा, सुशांत सावंत, संदीप भोसले, राकेश कांगो, फैजान बेग, अझर फारनोद, दानिश खान, राजु मगरे, भगवान माळी यांच्‍या कोठडीत वाढ केली आहे. या घटनेतील फरार संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. एका मुलीच्या खिशामध्ये ड्रग्ज सापडल्याने त्याचा तपास होणे बाकी असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील मिलींद निर्लेकर यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायमुर्ती आर. एन. खान यांच्या समोर केल्याने या आरोपींना पोलिस कोठडी सुनावली. पार्टी झालेल्‍या ठिकाणचा बंगला मालक रणवीर सोनी याची मुंबईत चौकशी केल्‍यानंतर इगतपुरीतून त्‍याला पोलिसांनी अटक केली असल्‍याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.



तर बंगले मालकांना करणार सहआरोपी

या घटनेनंतर पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी इगतपुरी व परीसरातील बंगले मालकांसाठी सूचना जारी केली आहे. आपल्‍या बंगल्‍याचा गैरवापर होत नाही ना, याची खातरजमा मालकांनी करायला हवी. अशा स्‍वरुपाच्‍या घटना उघडकीस असल्‍यास संबंधित बंगले मालकांना सहआरोपी केले जाईल, असे पाटील यांनी स्‍पष्ट केले.


(25 suspects including Hina Panchal remanded in police custody till July 5)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT