Panveli that has been washed into Godapatra here due to the recently released rotation. esakal
नाशिक

Nashik News : पानवेलीसंदर्भात शासनासह प्रशासनाची ढकला- ढकल! संसदेसह विधानसभेतही चर्चा; कारवाई शून्य

सकाळ वृत्तसेवा

चांदोरी (जि. नाशिक) : गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आ वासून उभा आहे. उन्हाळा आला की गोदावरीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढत असल्यामुळे वाढलेले प्रदूषण व पिण्यास अयोग्य बनणाऱ्या गोदावरी नदीत जलपर्णीचा विळखा वाढतच जातो.

दरवर्षी जमेल तेवढा प्रयत्न करीत जलपर्णी हटवून गोदावरी नदी स्वच्छ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो; मात्र जलपर्णी हटवण्यासह कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. (ignorace of Panveli by administration with government Discussions in Parliament Legislative Assembly Action zero Nashik News)

गोदावरी नदीच्या प्रदूषणाकडे शासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचा काणाडोळा आहे; मात्र त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. दररोज गोदावरी नदीपात्रात याबरोबरच निर्माल्यासह कचरा, शेवाळाचा थर आदी विविध कारणांमुळे बारमाही वाहणाऱ्या गोदावरी नदीने प्रदूषणाची कमाल मर्यादा कधीच ओलांडली आहे.

प्रदूषणाबाबत तक्रारी झाल्यानंतर प्रशासनाकडून जुजबी कारवाई करण्यासह कागदी घोडे नाचविण्यात येते.त्यामुळे प्रदूषणाच्या प्रश्नाची मात्र ‘नेमिची येतो पावसाळा...’ अशी अवस्था बनली आहे.

नदीकाठच्या नागरिकांच्या

आरोग्याबरोबरच जलचरांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. जलचर मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत. पिण्यायोग्य पाणी नसल्याने ऐन उन्हाळ्यात काही गावांची शुद्ध पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे. त्यातच जलपर्णीच्या समस्येने पुन्हा भर घातली आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात प्रवाह थांबला की सांडपाण्याचा थर वाढत जातो. त्यामुळे जलपर्णीची समस्या आणखी बिकट बनते. जलपर्णीमुळे सायखेडा चांदोरी नदीवरील पूल त्याचबरोबर विविध गावांच्या पाणी योजनांच्या जॅकवेलला धोका निर्माण होतो.

नुकताच गोदावरी नदीत सायखेडा परिसरात सांडपाण्यामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलून दुर्गंधीयुक्त पाणी मुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. हे पाणी शेतीसाठी उपसा केल्यानंतर शेतकरी ॲलर्जी व त्वचेच्या समस्येने हैराण झाले.

दारणा सांगवीपासून गोंडेगाव व तेथून पुढे नांदूरमध्यमेश्वरपर्यंत जलपर्णीच दिसून येत असल्यामुळे मैदानाचे स्वरूप आले होते. जलपर्णीमुळे जलचरांना ऑक्सिजन मिळत नसल्याने जलचर तडफडून मृत्युमुखी पडत आहेत.

त्यामुळे फक्त नाशिक महानगरपालिका हद्दीपर्यंत जलपर्णी हटविली जात असून मात्र, या कामात सरकारी कामाचा फटकाही सहन करावा लागला. ‘सकाळ’ च्या माध्यमातून जलपर्णी हटवण्यासाठी आवाज उठवला जात असताना प्रशासन मात्र सुस्त दिसून आले. त्यामुळे जलपर्णीचा प्रश्न कायमस्वरूपी कसा संपुष्टात येणार, असा प्रश्न आजही कायम आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

उपाय योजना राबविण्याची गरज

जलपर्णी कायमस्वरूपी हटवण्यासाठी व्यावहारिक पर्याय अद्यापही उपलब्ध नाही;मात्र उल्हास नदीच्या धर्तीवर सगुणा फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांची दखल घेत जलपर्णी हटविण्याचे काम करण्यासाठी सातत्य राखण्याची गरज आहे.

लोकप्रतिनिधींच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा

खासदार डॉ भारती पवार यांनी सन २०२१ मध्ये संसदेच्या अधिवेशनात तर सन २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी पानवेलीचा मुद्दा उचलला, सखोल चर्चा होऊन ही त्यावर कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वाहत्या पाण्याबरोबर पानवेली वाहत असतांना त्यासोबत करायच्या उपाय योजना ही वाहून जात असल्याची चर्चा गोदाकाठ भागात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT