The dead stock in the Nagasaki dam has also reached 50 percent. esakal
नाशिक

Nashik Drought News : पाणी वाटपाच्या लढ्यात शेती सिंचनाकडे दुर्लक्ष

Ignoring agricultural irrigation in the struggle for water allocation...

सकाळ वृत्तसेवा

Nashik Drought News : जायकवाडीला पाणी सोडण्यावरून दरवर्षी मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्र असा संघर्ष निर्माण होत असताना या दोघांच्या भांडणात शेतीसाठी मिळणाऱ्या पाण्यात कपात होत आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील धरणे सरासरी ८४ टक्के भरलेली आहेत.

पण त्यापैकी ३० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी हे पिण्यासह उद्योगधंद्यांसाठी राखीव ठेवले आहे. वर्षानुवर्षे हा आकडा वाढतच असल्‍याने सिंचनासाठी मिळणाऱ्या आवर्तनांमधील कपात दुर्लक्षित राहते.(Ignoring agricultural irrigation in struggle for water allocation nashik drought news )

त्‍यामुळे सिंचन पुनर्स्‍थापनेचा विचार झाल्‍याशिवाय हा संघर्ष मिटणार नसल्‍याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. नाशिक जिल्ह्यातील बारा लहान-मोठ्या धरणांमध्ये ठणठणाट आहे. त्यामुळे या भागात यंदा तीव्र पाणीटंचाई जाणवेल. त्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन जलसंपदा विभागाला करावे लागेल. ऊर्ध्व गोदावरी धरण समूहात मुबलक प्रमाणात साठा दिसतो.

त्यातून पिण्यासाठी पाणी देण्यास कुणाचाही हरकत असण्याचे कारण नाही. पण कुठलेही धरण बांधताना सिंचनाला त्या धरणातून किती पाणी मिळणार याची निश्चिती होते. अर्थात, पिण्यासाठी प्राथमिकता दिली जाते. परंतु, उद्योगधंद्यांना सर्रासपणे परवानगी देवून धरण साठ्यावर अतिक्रमण होत असल्याने सिंचनाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालला आहे.

नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागा, फळबागा व पिकांना पाटाने येणाऱ्या पाण्याचा सर्वाधिक आधार असतो. या शेतकऱ्यांना पाण्यापासून तोडण्याचे काम अप्रत्यक्षपणे होत असल्याने द्राक्ष बागांची संख्या घटत चालली आहे. उत्पादनाचा वाढता खर्च आणि पाण्याची अनिश्चितता ही याची प्रमुख कारणे असल्याचे कृषीतज्ञ सांगतात.

तीनच तालुके दुष्काळग्रस्त

राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त ४० तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील मालेगाव, येवला व सिन्नर या तीनच तालुक्यांचा समावेश झाला आहे. सर्वाधिक भीषण दुष्काळ हा नांदगाव, चांदवड तालुक्यात असताना त्यांचा समावेश का झाला नाही, याविषयी आता वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत.

दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी ही पूर्णत: मानवी हस्तक्षेप विरहित म्हणजेच तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. त्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या पुढील यादीत जिल्ह्यातील अजून काही कृषी मंडळांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

पीकविमा रकमेची प्रतीक्षा संपेना

शेतकऱ्यांना कापणीपुर्व मदत म्हणून पीकविमा रकमेच्या २५ टक्के रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ओरिएन्टल पीकविमा कंपनीला सप्टेंबरमध्ये दिले आहेत. त्याआधारे निफाड, नाशिक, चांदवड, सिन्नर, दिंडोरी, मालेगाव, देवळा, सटाणा, नांदगाव व येवला तालुक्यांतील ५५ महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना अद्याप मदतीची प्रतीक्षा लागून आहे.

जिल्ह्यातील १२ धरणांमध्ये ठणठणाट

खडकओझर, दरसवाडी, खडकजांब (चांदवड), खिर्डीसाठे, डोंगरगाव, सावरगाव (येवला), नागासाक्या, लोहशिंगवे, रणाखेडा (नांदगाव), झाडी, दुंधे (मालेगाव) भालूर (कळवण)

जिल्ह्यातील धरणांमधील साठा

मुकणे-९५ टक्के

भावली-१०० टक्के

वाकी-९० टक्के

भाम-१०० टक्के

गोदावरी धरण समूह एकूण-९६ टक्के

दारणा-१०० टक्के

वालदेवी-१०० टक्के

कडवा-१०० टक्के

भोजापूर-९१ टक्के

गंगापूर-१०० टक्के

काश्यपी-१०० टक्के

गौतमी गोदावरी-१०० टक्के

आळंदी-९८ टक्के

गंगापूर धरण समूह-१०० टक्के

पालखेड-५० टक्के

करंजवण-१०० टक्के

वाघाड-१०० टक्के

ओझरखेड-८७ टक्के

तिसगाव-७१ टक्के

पुणेगांव-८१ टक्के

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पांत एकूण-९७ टक्के

चणकापूर-९९.५५ टक्के

हरणबारी-१०० टक्के

केळझर-९९ टक्के

माणिकपुंज-३५ टक्के

गिरणा-५७ टक्के

पूनंद-१०० टक्के

तापी खोरे एकूण-६५ टक्के

नाशिक जिल्ह्यात एकूण साठा-८४ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT