During the operation conducted by the Nashik rural police on Tuesday at the illegal biodiesel manufacturing base in MIDC, the tankers and plastic tanks from the shed were seized. esaka
नाशिक

Nashik Crime News : जानोरी MIDCत अवैध Biodiesel निर्मिती; 1 कोटींचे अवैध इंधन जप्त

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : जानोरी (ता. दिंडोरी) एमआयडीसीमधील बायोडिझेल निर्मिती अड्ड्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत एक कोटी एक लाख रुपयाचा अवैध डिझेल, सदृश ज्वलनशील पेट्रोलियम पदार्थाचा साठा जप्त केला आहे. (Illegal Biodiesel Production in Janori MIDC Illegal fuel worth 1 crore seized Nashik Latest Crime News)

नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सध्या जिल्हाभर अवैध धंद्याविरोधात मोठी शोध मोहीम राबवीत आहेत. यात दिंडोरी तालुक्यातील जानोरी शिवारातील एमआयडीसीमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये बायोडिझेलचा अवैध साठा असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह जानोरी एमआयडीसीमधील कान्हा एंटरप्राइजेस गट क्रमांक ५९९/३, प्लॉट नंबर १६ मध्ये पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम अवैधरीत्या डिझेल सदृश पदार्थांमध्ये ज्वलनशील पदार्थाची भेसळ करीत असताना आढळले.

यावेळी संशयित अनिल भवानभाई राधाडिया (वय ३७; रा. सुरत, गुजरात), दीपक सूर्यभान गुंजाळ (वय ४१, रा. प्लॉट नंबर १३, आर्या हाईट्स, कोणार्क नगर, नाशिक), इलियास सज्जाद चौधरी (वय ४३, वाहन चालक, रा. कुर्ला), कलिना मेहबूब (चाळ रूम नंबर १५, रा. सोना ता. तारागंज, जिल्हा गोंडा उत्तर प्रदेश), अब्रार अली शेख (वय ३७, क्लीनर, रा. शिवडी, मुंबई), अजहर इब्रार हुसेन अहमद (वय २१, रा. नरसिंग गड ता. राणीगंज जि. प्रतापगड उत्तर प्रदेश) ही पाच व्यक्ति स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गिनॉल-१२१४/३० HC बल्क नावाचे केमिकल व MADSO B ८० या नावाचे केमिकल असून यांचे विनापरवाना बेकायदेशीर पेट्रोलियम विभागाचा कोणताही आवश्यक तो परवाना न घेता तसेच मानवी जीवनात धोका पोहोचल अशा रीतीने एकत्रितरीत्या मिश्रण करून त्यातून डिझेल सारख्या ज्वलनशील पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने तयार करताना मिळून आले.

त्यांच्या ताब्यातून दोन टँकर (क्रमांक जीजे १२ BZ ८८२५ व MH ४३ BG ७९६७ या क्रमांकाचे दोन केमिकलने भरलेले टँकर व प्लॅस्टिक टाक्या भरलेले ज्वलनशील पदार्थ व इतर साहित्य असा एक कोटी एक लाख ६८ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वरील पाच इसमांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलिसात अवैधरीत्या डिझेलसारखा सदृश ज्वलनशील पदार्थ बाळगून मानवी जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत पाटील, संदीप जगताप, दीपक अहिरे, गिरीश बागूल, विनोद टिळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुरवठा निरीक्षक अक्षय लोहारकर, तलाठी किरण भोये यांनी पंचनामा केला. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, संदीप धुमाळ पुढील तपास करीत आहेत.

अवैध धंद्याचा तिसऱ्यांदा पर्दाफाश

जानोरी एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या व वेअर हाऊस असून त्यामध्ये यापूर्वी देखील बेकायदेशीर गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये रेशनच्या अवैध गव्हाचा साठा जप्त करण्यात आला होता. तसेच या परिसरातील एका कंपनीत बोगस सॅनिटायझर निर्मितीचा कारखाना देखील सापडला होता. अवैध इंधनाचा साठा सापडण्याची ही तिसरी घटना असून याबाबत स्थानिक प्रशासनाला कुठलेही माहिती नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी प्रशासनाने सर्वच केमिकल कंपन्या व वेअर हाऊस यांची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT