अंबासन (जि. नाशिक) : येथील मोराणे- अंबासन रस्त्यावर गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती गावातील तरूणांना मिळताच सिनेस्टाईलने पाठलाग करीत पिकअप वाहन व तब्बल अकरा गोवंश जातीची जनावरे पकडली. जमावाने वाहनातील दोन संशयितांना चोप देत जायखेडा पोलिसांच्या ताब्यात दिले असून, जनावरांवर उपचार करून गोशाळेत रवाना केले आहे. (Illegal cattle trafficking to Ambasan 11 cattle rescued nashik Latest Marathi News)
अंबासन येथील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यानजीक गोवंश जनावरांची वाहनातून मालेगाव येथे कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक तरूणांना मिळताच तरूणांनी ठिकठिकाणी रस्त्यावर पहारा दिला होता. गोवंश वाहतूक करणाऱ्या संशयितांना याबाबत कुणकुण लागताच एका वाहनाने धूम ठोकली.
तर एक पिकअप (क्र. एमएच- ४८- टी- ८१३२) वाहन अकरा गोवंश जनावरे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना आढळून आले. पिकअप अतिजलद असल्याने काही तरूणांच्या अंगावरही घालण्याचा प्रयत्न संशयितांनी केल्याचे सांगण्यात येते. संतप्त तरूणांनी पाठलाग करीत मोसम नदीकाठावरील रस्त्यावर वाहन पकडले. मात्र, तीन संशयितांपैकी दोन जण फरार झाले होते. वाहनाजवळ मोठा जमाव तयार झाला होता.
जमावाने संशयितास चोप देत वाहन बसस्थानक आवारात आणले. तरूणांनी दुसऱ्या संशयितास पकडून आणले. तर एक फरार होण्यास यशस्वी झाला. जायखेड्याचे पोलिस उपनिरीक्षक तुषार भदाणे व हवालदार राजेंद्र सोनवणे, गोटमवार यांनी संशयिताला वाहनासह ताब्यात घेतले. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार भदाणे तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.